शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

विकासकामांचे १,५०० प्रस्ताव रखडले

By admin | Updated: January 3, 2015 01:07 IST

शहरातील विकासकामांचे जवळपास १,५०० प्रस्ताव रखडले आहेत. निविदा प्रक्रिया उशिरा होत आहेत. कामे रखडविण्याचे षडयंत्र प्रशासनाने रचले असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केला आहे.

नवी मुंबई : शहरातील विकासकामांचे जवळपास १,५०० प्रस्ताव रखडले आहेत. निविदा प्रक्रिया उशिरा होत आहेत. कामे रखडविण्याचे षडयंत्र प्रशासनाने रचले असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केला आहे. नवी मुंबईमधील प्रभाग समिती व नगरसेवक निधीमधील कामे वेळेवर होत नसल्यामुळे नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी प्रशासनास धारेवर धरले. एक ते दीड हजार छोट्या कामांच्या निविदा झालेल्या नाहीत. प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागातील ८ ते ९ कामांच्या फाईल तयार झाल्या आहेत. परंतु निविदा काढल्या जात नाहीत. महापालिकेस कररूपाने ८०० कोटी रुपयांचे उत्पन्न झाले व प्रत्यक्षात खर्च ८६० कोटींवर गेला असल्याचे बोलले जात आहे. याचमुळे कामे उशिराने केली जात आहेत. विकासकामे रखडविण्याचे षडयंत्र प्रशासनाने रचले आहे. नगरसेवकांना उल्लू बनविण्याचे काम सुरू आहे. निवडणुकांपूर्वी कामे होणार का याची माहिती द्या, अशी विचारणा त्यांनी केली. सूरज पाटील यांनीही प्रभाग समितीची कामे धीम्या गतीने सुरू आहेत. हा वेग राहिला तर आता मंजूर असलेली कामे निवडणुकीनंतरच सुरू होतील अशी शक्यता व्यक्त केली. शिवसेना नगरसेवकांनीही रखडलेल्या कामांविषयी नाराजी व्यक्त केली. ८९ नगरसेवकांच्या प्रभागातील अनेक जनहिताची कामे थांबली आहेत. ही कामे कधी पूर्ण होणार याविषयी आयुक्तांनी माहिती दिली पाहिजे. आयुक्तांना सभागृहात बोलवा तोपर्यंत सभा सुरूच ठेवा अशी मागणी केली. महापालिकेच्या ई - टेंडर प्रणालीद्वारे निविदा प्रक्रिया वेळेवर होत नाहीत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. प्रशासनाने सर्व कामे कधी मार्गी लागणार याविषयी स्पष्ट भूमिका सांगावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले होते. आयुक्त सभागृहामध्ये येईपर्यंत सभा तहकूब करा, अशी मागणीही नगरसेवकांनी केली. नगरसेवक आक्रमक झाल्यामुळे प्रशासन उपआयुकत जगन्नाथ सिन्नरकर यांनी मंजूर असलेली सर्व विकासकामांची निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण केली जाईल. निवडणुकीपूर्वी कामे सुरू करण्यात येणार असून कोणतीही कामे रखडविली जाणार नसल्याचे स्पष्ट करून सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शासनाने नोव्हेंबर २०१४ ला अध्यादेश काढून सर्व शासकीय संस्थांमध्ये ३ लाखांपेक्षा जास्त किमतीच्या कामांसाठी ई -निविदेचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत. परंतु स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी यास तीव्र विरोध केला. महापालिकेत सद्यस्थितीमध्ये निविदा प्रक्रिया धीम्या गतीने होत आहे. ३ लाखांपेक्षा जास्त कामासाठीही ही प्रक्रिया राबविली तर विकासकामे रखडतील त्यामुळे पुढील एक महिना या निर्णयाची अंमलबजावणी केली जावू नये असा आग्रह धरला व नगरसेवकांचा विरोध शासनास कळविण्यात यावा अशी सूचना केली. अधिकारी निरुत्तरच्स्थायी समितीमध्ये सर्वच नगरसेवक आक्रमक झाले होते. ई - निविदेविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांनाही समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यांच्या प्रत्येक मुद्यावर हरकत घेतली जात होती. त्यांनी रिंग होऊ नये यासाठी ई - निविदा आवश्यक असल्याचे शासनाचे मत असल्याचे सांगितले. परंतु नगरसेवकांनी रिंग होते असा अर्थ काढून त्यांना धारेवर धरले. अखेर त्यांनी शब्द मागे घेतले. प्रश्नांचा भडिमार थांबत नसल्याने सर्वच अधिकारी निरुत्तर झाले होते.