शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीमधून १५०० किलो प्लॅस्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:29 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ व एपीएमसी प्रशासनाने प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात मोहीम राबविली.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ व एपीएमसी प्रशासनाने प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात मोहीम राबविली. दोन दिवसांमध्ये १५०० किलो प्लॅस्टिक जप्त केले असून, ३५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी धाडी टाकून प्लॅस्टिकचा मोठा साठा जप्त केला आहे. महानगरपालिकेनेही यापूर्वी अनेक वेळा धाडी टाकून प्लॅस्टिकची विक्री करणाºयांवर कारवाई केली आहे. यानंतर दोन दिवस बाजार समिती व एमपीसीबीच्या अधिकाºयांनी मसाला मार्केटमध्ये संयुक्त मोहीम राबविली. पहिल्या दिवशी २०० किलो व दुसºया दिवशी तब्बल १३०० किलोचा साठा हस्तगत केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी केतन पाटील, इंद्रजीत देशमुख, बाजार समितीचे किरण घोलप, सी. टी. पवार, आर. आर. गुरव यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता. एमपीसीबीच्या पथकाने मार्केटमध्ये जनजागृती केली. माल पाठविणाºयांनाही प्लॅस्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले.व्यापाºयाने दिली चिल्लरप्लॅस्टिक सापडलेल्या व्यापाºयांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रॉयल मसाला व ड्रायफ्रुट कंपनीच्या दुकानदाराने ५ हजार रुपयांची चिल्लर दंड स्वरूपात दिली. यामुळे कारवाई करणाºया पथकाला चिल्लर मोजण्यास खूप वेळ गेला. कारवाई करणाºयांना मकरंद अनासपुरे यांची भूमिका असलेल्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटाची आठवण झाली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNavi Mumbaiनवी मुंबई