शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या सभेसाठी दीड लाख क्षमतेचा सभामंडप; खारघर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

By कमलाकर कांबळे | Updated: January 10, 2024 13:41 IST

विविध प्रकल्पांचे होणार लोकार्पण, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या कामांना वेग

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.  त्यांच्या सभेला जवळपास दीड लाख लोकांची उपस्थिती गृहीत धरून या ठिकाणी सभामंडप आणि इतर सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. अधिकाऱ्यांनी मंगळवारी कार्यक्रम स्थळाला भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला.

एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या  शिवडी-न्हावा-शेवा सागरी सेतूचे यावेळी पंतप्रधान मोदी लोकार्पण करणार आहेत, तसेच याच वेळी महिला सशक्तीकरणाचाही प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला  मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित राहतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

खारघर येथे झालेल्या सोहळ्यातील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. विशेषत: वैद्यकीय सुविधांवर अधिक भर असून आरोग्य उपसंचालकांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्थळावर सुविधांचा आढावा घेतला.

विविध प्रकल्पांचे होणार लोकार्पण

या दौऱ्यात एमटीएचएल या सागरी सेतूच्या लोकार्पणासहित एमएमआरडीएच्या इतर प्रकल्पांचेही लोकार्पण होणार आहे. तसेच नवी मुंबई  मेट्रो,  खारकोपर-उरण रेल्वे आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. तसेच रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे.

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या कामांना वेग

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन १२ जानेवारीला होत आहे. पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असल्यामुळे महामार्गावर उलवे परिसरामध्ये स्वच्छतेच्या कामांना वेग आला आहे. न्हावा शेवा शिवडी सागरी मार्ग, मेट्रो, दिघा स्टेशन व उरण रेल्वेमार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे बंदोबस्तासह सार्वजनिक सुविधा पुरविण्यासाठी शासकीय यंत्रणांनी विविध कामे सुरू केली आहेत. सायन-पनवेल महामार्ग, जेएनपीटी रोड, पनवेलकडून कार्यक्रम स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यासह उलवे नोडची साफसफाई केली जात आहे.

समन्वयक अधिकाऱ्यांवर कोणती जबाबदारी?

वैद्यकीय सुविधा - डॉ. प्रशांत जवादे यांच्य नियंत्रणाखालील टीमवर वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका पुरविणे व सर्वप्रकारची आरोग्याविषयी सुविधा देण्याची जबाबदारी दिली आहे.स्वच्छतेकडे लक्ष - रस्त्यांची साफसफाई करण्यासाठीची जबाबदारी घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखालील समितीकडे सोपविली आहे.परिवन सेवा - कार्यक्रमाच्या मार्गावर बसेस उपलब्ध करून देण्याची व त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी परिवहन उपायुक्त योगेश कडूस्कर यांच्यावर सोपविली आहे.फिरते शौचालय - फिरते शौचालय पुरविणे, त्यांची स्वच्छता ठेवणे, संरक्षण युनिट, जेट मशीनची व्यवस्था करण्याची जबाबदारी उपायुक्त सोमनाथ पोटरे व श्रीराम पवार यांच्यावर सोपविली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNarendra Modiनरेंद्र मोदी