शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत नमुंमपा शाळांतील १३१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत 

By नारायण जाधव | Updated: September 1, 2022 15:11 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणा-या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून 131 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले  झाले आहेत.

नवी मुंबई -

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणा-या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून 131 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले  झाले आहेत.यामध्ये विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 91, दिवा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी स्वहम पितांबर पात्रा या विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादन करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हिजनचा नावलौकीक उंचाविला आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 33 शाळांमधील इयत्ता 8 वीतील 582 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये तब्बल 131 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत मानांकन पटकाविले असून त्यांना दरमहा 1 हजार याप्रमाणे वर्षाला 12 हजार इतकी शिष्यवृत्ती रक्कम मिळाणार आहे. ही शिष्यवृत्ती रक्कम इयत्ता 12 वी पर्यंत या विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.

याशिवाय महानगरपालिका शाळांतील गुणसंपन्न विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला आर्थिक बळ मिळावे यादृष्टीने उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा यामध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविणा-या शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रति महिना रु.600/- इतका आर्थिक लाभ या शैक्षणिक वर्षापासून देण्यास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंजूरी दिली आहे. त्यानुसार या 131 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

इयत्ता 8 वी च्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला आर्थिक कारणांमुळे अडचणी येऊ नयेत यादृष्टीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेतली जात असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल आयुक्त  बांगर यांनी ठाणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने शिष्यृत्ती प्राप्त विद्यार्थी स्वहम पात्रा व इतर सर्व गुणवत्ता यादीत मानांकन मिळविणा-या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :examपरीक्षा