शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात १२५ कृत्रिम तलावांची होणार निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 01:21 IST

या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असला, तरी कृत्रिम तलावांची भर पडल्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि विसर्जन स्थळावर गर्दी टळणार आहे.

योगेश पिंगळे नवी मुंबई : गणपती विसर्जन काळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिका, नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने शहरात १२५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असला, तरी कृत्रिम तलावांची भर पडल्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि विसर्जन स्थळावर गर्दी टळणार आहे.२५ जुलै रोजी आठही विभागीय स्तरावर महापालिका व पोलीस अधिकारी यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. विसर्जनाच्या दिवशी गर्दी न होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांमध्ये नागरिकांना सोयीचे ठरेल, अशा जागांवर जास्त संख्येने कृत्रिम तलाव निर्माण करावेत, तसेच तलावातील पाणीव्यवस्था, पूजा व आरतीसाठी टेबल्स, विसर्जनासाठी स्वयंसेवक व्यवस्था अशा बाबींकडेही लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या दृष्टीने सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित विभागाचे सहायक आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने शहरातील आठही विभागांतील जागांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, कृत्रिम तलावांच्या निर्मितीसाठी १२५ जागा निच्छित करण्यात आल्या आहेत.या वर्षी शहरातील काही मंडळांनी दहा दिवसांऐवजी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. नवी मुंबई शहरात महापालिकेची २३ विसर्जन स्थळे असून, त्यामध्ये १२५ कृत्रिम तलावांची भर पडणार असून, १४८ विसर्जन स्थळे निर्माण होणार आहे.