शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

१२ गावे आणि २८ वाड्यांतील आदिवासींना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 02:43 IST

अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रायगड जिल्ह्यातील आदिवासींच्या हक्काच्या दळी जमीन व सामूहिक जमीन दाव्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी

अलिबाग : अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रायगड जिल्ह्यातील आदिवासींच्या हक्काच्या दळी जमीन व सामूहिक जमीन दाव्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पेण तालुक्यातील बरडावाडी येथे दौरा केला. त्यानंतर शासकीय यंत्रणेने प्रभावी काम केल्याने पाबळ खोऱ्यातील १२ गावे २८ वाड्यांना न्याय मिळाला आहे, असे प्रतिपादन जांबोशी येथे आयोजित मेळाव्यात, आदिवासी क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते व साकव स्वयंसेवी संस्थेचे सचिव अरुण शिवकर यांनी केले आहे.साकव स्वयंसेवी संस्था, आदिवासी विकास मंच व कुणबी समाजोन्नती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात पेणचे आमदार धैर्यशील पाटील व पेण तालुक्याच्या तहसीलदार सुकेशिनी पगारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना वनजमीन व हक्काचे दस्त प्रदान करण्यात आले. त्यावेळी शिवकर बोलत होते. वनामध्ये शेकडो वर्षे वास्तव्य करून वन उपजावर उपजीविका करणाऱ्या आदिवासींना अनुसूचित जनजमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६ व २००८ अन्वये वैयक्तिक दाव्यांच्या स्वरूपात येथील २८ वाड्यांतील ४७१ आदिवासींना त्यांचे जमिनीवरील हक्क प्राप्त होऊन त्याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दळी जमीन व सामुहिक दाव्यांच्या बाबतीत रायगड जिल्ह्यातील अनेक संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठविला व हा प्रश्न उचलून धरला होता, असे शिवकर यांनी सांगितले.याच प्रश्नासंदर्भात २८ एप्रिल २०१५ ला बरडावाडी येथे झालेल्या राज्यपालांच्या दौऱ्यानंतर दळी व सामूहिक दाव्यांच्या प्रश्नाला चालना मिळून या संदर्भात अनेक दावे सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसह देण्यात आले व याची फलश्रुती म्हणून १६ वाड्यांतील सामूहिक दळी दावे मंजूर करण्यात आले. तर १२ गाव वाड्यांतील सामूहिक दावे मंजूर करण्यात येऊन पाबळ खोऱ्यातील १२ गावे व २९ वाड्यांना याचा लाभ मिळाला आहे. साधारणत: ७४७ हेक्टर दळी जमीन क्षेत्र व ३७७६ हेक्टर सामूहिक दाव्यांमुळे गौण उपजाचे अधिकार प्राप्त झाले असल्याचेही शिवकर यांनी सांगितले. यावेळी आर.बी. खंडागळे, व्ही.एस. पवार, मधुकर महाबळे आदी उपस्थित होते.