शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

सेवाकराची ११२ कोटींची थकबाकी

By admin | Updated: March 31, 2017 06:44 IST

सिडकोचा तब्बल ११२ कोटींचा सेवाकर थकला आहे. त्याच्या वसुलीसाठी सिडकोने ८ डिसेंबर २0१६ रोजी अ‍ॅम्नेस्टी

नवी मुंबई : सिडकोचा तब्बल ११२ कोटींचा सेवाकर थकला आहे. त्याच्या वसुलीसाठी सिडकोने ८ डिसेंबर २0१६ रोजी अ‍ॅम्नेस्टी योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत सेवाकरांवरील विलंब करावर १00 टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. ८ जून २0१७ रोजी ही योजना संपुष्टात येत असून मालमत्ताधारकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.खारघर, कळंबोली, पनवेल, द्रोणागिरी आणि उलवे क्षेत्रात सिडकोच्या माध्यमातून विविध सेवा पुरविल्या जातात. यात रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणा, मलवाहिन्या, घनकचरा व्यवस्थापन, पथदिवे आदी सुविधांचा समावेश आहे. या सुविधांवरील खर्च सेवा आकाराच्या माध्यमातून नागरिकांकडून वसूल केला जातो. मालमत्तेच्या भाडेपट्टा करारामध्ये संबंधित मालमत्ताधारकांनी प्रत्येक आर्थिक वर्षाचा सेवा आकार १ एप्रिल रोजी आगाऊ भरावा, असे नमूद करण्यात आलेले आहे. असे असले तरी नागरिकांच्या सोयीसाठी सिडकोच्या माध्यमातून या सेवाकरांच्या वसुलीसाठी प्रत्येक तीन महिन्यांनी देयके काढले जातात. परंतु त्यानंतरसुध्दा अनेकांनी हा कर भरला नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. सेवाकराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना दिलासा म्हणून अ‍ॅम्नेस्टी अर्थात अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. २४ नोव्हेंबर २0१६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली होती. या योजनेअंतर्गत थकबाकी असलेल्या एकूण सेवाकरावरील विलंब शुल्क शंभर टक्के माफ करण्यात आले आहे. सहा महिने कालावधीची ही योजना ८ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्याअगोदर थकबाकी भरणाऱ्यांना विलंब शुल्कात शंभर टक्के सूट मिळणार आहे, तर त्यानंतर पुढील सहा महिने म्हणजेच ८ डिसेंबर २0१७ पर्यंत ५0 टक्के सूट असणार आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित कालावधीत या योजनेचा लाभ घेऊन आपला थकीत कर भरावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)