शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

१११ कोटींची जेट्टी तयार, पण नेरुळ मुंबई जलवाहतुकीला मुहूर्त मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 12:18 IST

Navi Mumbai: नवी मुंबई ते मुंबईतील भाऊचा धक्कादरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिडकोने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. नेरुळ येथे साडेतीन हेक्टर क्षेत्रावर १११ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या जेट्टीवरून ही जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई - नवी मुंबई ते मुंबईतील भाऊचा धक्कादरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिडकोने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. नेरुळ येथे साडेतीन हेक्टर क्षेत्रावर १११ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या जेट्टीवरून ही जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. गेली दोन वर्षे मेरिटाइम बाेर्डाने जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी डोळेझाक केली. अखेर सिडकोने दोन पाऊले पुढे टाकून जलवाहतूक सुरू करण्यासाठी भागीदार निवडण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून नेरुळची जेट्टी धूळ खात होती. तिच्या देखभालीवर सिडकोला लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतूक यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. 

मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीए आणि मेरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्यातून सिडकोने नवी मुंबई ते मुंबईदरम्यान प्रवासी जलवाहतूक सुरू करण्यासाठी नेरूळ येथे जेट्टी बांधली आहे. एप्रिल २०१८ मध्ये तिच्या बांधकामास सुरुवात झाली. मात्र, कोरोनामुळे ते रखडलेेे होते. सिडकोने सप्टेंबर २०२१ मध्ये या जेट्टीचे काम पूर्ण केले. यासाठीचा संपूर्ण खर्च सिडकोने उचलला असला तरी मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून या मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार मेरीटाइम बोर्डानेही प्रवासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करून निविदासुद्धा मागविल्या होत्या. शिवाय प्रस्तावित तिकीट दरसुद्धा जाहीर केले होते. मात्र, काहीच हालचाल झाली नाही. विशेष म्हणजे केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत या जेट्टीच्या बांधकामानंतर बेलापूर येथे नव्याने बांधलेल्या जेट्टीवरून १७ फेब्रुवारी २०२२ रोजी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली होती. मात्र, याचे भाडे अधिक असल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरविली,  जेट्टी तयार असूनही जलवाहतूक सुरू झालेली नाही. याबाबत टीका होऊ लागल्याने सिडकोने मेरीटाइम बोर्डाच्या नादी न लागता ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

३ वर्षांसाठी परवानाजलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी जो सिडको भागीदार निवडणार आहे, त्यास पहिल्या टप्प्यात तीन वर्षांकरिता जलवाहतूक टर्मिनलचे संचलन, देखभालीसह  व्यवस्थापनाचे काम देणार  आहे. यासाठी इच्छुक निविदाकारास सरकारी उपक्रम, प्रतिष्ठित खासगी एजन्सी अंतर्गत किमान तीन वर्षांचा जलवाहतूक सेवेचा, जलवाहतूक टर्मिनलचे संचलन, देखभालीसह व्यवस्थापनाचा अनुभव हवा. त्याच्याकडे जलवाहतुकीसह फेरी आणि रो रो सेवा किंवा हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन सेवेचा परवाना हवा.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई