शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये ११ जणांना कोविड लसीकरणाचा त्रास, दोन महिला कर्मचारी रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 07:27 IST

शनिवारी एमजीएम रुग्णालय व येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयात या लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली.  मात्र या लसीकरणाचा बहुतांशी जणांना त्रास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वैभव गायकर -पनवेल : राज्यात दोन दिवसापूर्वी लसीकरणाला सुरुवात झाली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातदेखील हे लसीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २०० जणांना कोविड शील्ड लस देण्यात आली. मात्र यापैकी ११ जणांना या लसीचा त्रास झाला असुन २ महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी एमजीएम रुग्णालय व येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयात या लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली.  मात्र या लसीकरणाचा बहुतांशी जणांना त्रास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी ११ जणांची पालिकेकडे नोंद करण्यात आली आहे. दोन महिलांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ देखील आली.  लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी काही लोकांना त्रास जाणवायला लागले. यामध्ये ताप ,उलट्या आणि अंग दुखीचा त्रास काहींना जाणवला. पहिल्या टप्प्यात २०० जणांना लस देण्यातआल्यानंतर ऍपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे लसीकरण थांबविण्यात आले. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी देखील ११  जणांना लसीकरणाचा त्रास झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अकरा जणांना किरकोळ स्वरूपाचा त्रास आहे. ताप ,अंगदुखी आणि काहींना उलट्या झाल्याचे निदर्शनास आले. २ महिला कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणुन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. उर्वरित सर्वांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहेत.- संजय शिंदे, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरmedicineऔषधं