शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यसायावर कारवाई; ११ महिलांची सुटका

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 23, 2024 23:55 IST

ऑनलाईन मिळवले जात होते ग्राहक 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : ऑनलाईन ग्राहक मिळवून लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली आहे. शिरवणे एमआयडीसी मधील राज ईन लॉजमध्ये हा प्रकार चालत होता. त्याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सापळा रचून कारवाई केली आहे. 

लोकॅन्टो या साईटवरून नवी मुंबईत ऑनलाईन वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाने बनावट ग्राहक तयार केले होते. या ग्राहकाने दलालाला ऑनलाईन संपर्क साधला असता त्याने ग्राहकाला महिलांचे फोटो पाठवले होते. त्यानंतर ग्राहकाला शिरवणे एमआयडीसी मधील राज ईन लॉजमध्ये बोलवण्यात आले होते.

काही वेळानंतर दलाल त्याठिकाणी महिलांना घेऊन आला होता. यावेळी लॉजबाहेर सापळा रचून बसलेल्या पथकाने छापा टाकला. त्यामध्ये दलालाने शिरवणे गावातील इमारतीमध्ये इतरही महिला लपवून ठेवल्या असल्याचे समोर आले. यामुळे त्याठिकाणी देखील छापा टाकला असून एकूण ११ महिला मिळून आल्या. दलालामार्फत त्यांना देहविक्री करायला लावली जात होती.

या महिलांची सुटका करून किशोर साव, सुरेंद्र यादव, साहिल मंडल व पुरुषोत्तम शेट्टी यांच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर. के. लॉज हा दलालांमार्फत केवळ वेश्याव्यवसायाला वापरला जात होता. यामुळे तिथे येणाऱ्या ग्राहकांची नॉन देखील ठेवली जात नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी