शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

राष्ट्रीय आवास बँकेच्या १०३७ कोटीच्या कर्जातून राज्यातील महानगरांत पायाभूत सुविधा

By नारायण जाधव | Updated: January 8, 2024 16:56 IST

नवी मुंबईसह राज्यातील शहरांना होणार लाभ.

नारायण जाधव,नवी मुंबई : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांसांठी महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय आवास बँकेकडून १०३७ कोटी ४८ लाखांचे कर्ज घेणार आहे. या कर्जातून राज्यातील सर्व शहरांत पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

यानुसार कोणत्या महानगरांत कोणत्या पायाभूत सुविधांची गरज आहे, याचा निर्णय मात्र राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार आहे. यामुळे नवी मुंबईसह राज्यातील २८ महापालिकांसह नगरपालिकांच्या छोट्या शहरांत पायाभूत सुविधा निर्माण करणे सोपे होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ अर्थसंकल्पात ग्रामीण पायाभूत विकास निधीच्या (RIDF) धर्तीवर शहरी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता नागरी पायाभूत विकास निधी राष्ट्रीय आवास बँकेमार्फत उभारण्यात येईल, अशी घोषणा केली हाेती. त्यानुसार वित्त विभागाने देशातील सर्वच शहरांमध्ये पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याचे निर्देश राष्ट्रीय आवास बँकेत दिले होते. त्यानंतर राष्ट्रीय आवास बँकेच्या संचालकांनी महाराष्ट्र शासनाला राज्यातील विविध शहरांतील पायाभूत सुविधांसाठी १०३७ कोटी ४८ लाखांपर्यंतचे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने विविध शहरांतील पायाभूत सुविधांचे प्रस्ताव तयार करून ते नियोजन विभागाची मान्यता घेऊन मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडे पाठवायचे आहेत.या अटींची पूर्तता करावी लागणार :

या योजनेंतर्गत संबधित विभागाने शहरांत निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी आधी आपल्या अर्थसंकल्पात तरतूद करायची आहे. त्या तरतुदीतून पायाभूत सुविधांसाठी खर्च केल्यानंतर त्याची प्रतिपूर्ती राष्ट्रीय आवास बँकनंतर करणार आहे. मात्र,केंद्र शासन व राष्ट्रीय आवास बँकेने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसारच या नागरी पायाभूत सुविध निर्माण करण्याची अट घातली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईbankबँक