शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनबद्ध विकासासाठी १०० ग्रोथ सेंटर्स, नगरविकास विभागाचा निर्णय 

By नारायण जाधव | Updated: January 18, 2025 10:09 IST

राज्यात नागरिकरणाचे प्रमाण ४५.२३ टक्के इतके मोठे आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई : पनवेल, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, वसई-विरारसह राज्यातील सर्वच महापालिका, नगरपालिकांच्या शहराबाहेरील परिसराचाही पसारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र, तो अनियंत्रित आणि नियोजनबद्ध होत नसल्याने महानगरांबाहेर नागरी सुुविधांची बोंब दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे राज्यातील सर्वच शहरांबाहेरील परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी राज्यात १०० ग्रोथ सेंटर्स उभारण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे.

राज्यात नागरिकरणाचे प्रमाण ४५.२३ टक्के इतके मोठे आहे. व्यापक प्रमाणावर होणाऱ्या नागरिकरणामुळे पायाभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी सध्याच्या विद्यमान २७ पालिका आणि ३८१ नगरपालिकांवरील ताण वाढतच चालला आहे. यामुळे अनेक  ठिकाणी लोकसंख्या हळूहळू शहराच्या हद्दीबाहेर जात आहे. शहरांबाहेरील या विभागांचा एक दिवस त्या त्या पालिका किंवा नगरपालिकेत समावेश होणारच आहे. 

क्षेत्रांचा अभ्यास मात्र, जोपर्यंत हा समावेश होत नाही तोपर्यंत त्या परिसराचा अनियंत्रित विकास होऊन अनधिकृत बांधकामे वाढण्यासह पायाभूत सुविधांची वानवा वाढणार आहे. यामुळेच राज्यातील सर्वच शहरांबाहेरील अशा क्षेत्रांचा अभ्यास  करून  तेथे विकास योजनांसह विकास आराखडे तयार करून १०० परिसर विकास केंद्र अर्थात ग्रोथ सेंटर्स प्रस्तावित करण्यासाठी नगरविकास विभाग पुढे सरसावला आहे. 

समितीत यांचा आहे समावेश शहराबाहेरील वाढीव विभागांचा अभ्यास करून कोणत्या क्षेत्राचा कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत समावेश करावा, यासाठी नगरविकासने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. नगरविकास १ व २ यासह ग्रामविकास, वित्त विभागाच्या प्रधान सचिवांसह नगररचना संचालकांचा समावेश आहे. 

दोन महिन्यांची मुदत शहराबाहेरील अशा क्षेत्रांचा अभ्यास करून तेथे कोणत्या पायाभूत सुविधांवर किती ताण पडेल, त्या पुरविण्यासाठी काय करावे  लागेल यासह अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी काेणते उपाय योजावेत, ते कायदेशीररीत्या टिकतील काय,  विकासनिधी किती लागेल, याचा अभ्यास करून  १०० ग्रोथ सेंटर्स प्रस्तावित करण्याबाबतचा अहवाल दोन महिन्यांत सादर करण्याचे काम समितीकडे आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई