जि.प.च्या शाळा होणार सेमी इंग्लिश
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
समितीचा निर्णय : गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविले
जि.प.च्या शाळा होणार सेमी इंग्लिश
समितीचा निर्णय : गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविलेनागपूर : आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजीचे महत्त्व विचारात घेता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा टप्प्याटप्प्याने सेमी इंग्लिश करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे.पुढील शैक्षणिक सत्रापासून जि.प.च्या १५८२ शाळांत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. गटविकास अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १ ली व ५ वीच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिशमधून शिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. टप्प्याटप्प्याने तो सर्व वर्गांसाठी लागू केला जाणार आहे. पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढला आहे. त्यामुळे जि.प.शाळांतील पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. सेमी इंग्लिशमधून शिक्षण मिळाले तर पटसंख्या कमी होण्याला आळा बसण्याची अपेक्षा आहे. शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक सत्र सुरू असताना शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. याचा परिणाम शिक्षणावर होतो. ही बाब विचारात घेता शिक्षण विभागाने प्रशिक्षणाचा कार्यक्र म उन्हाळ्यात राबवावा, अशा आशयाचा विनंती प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. (प्रतिनिधी)चौकट...शिक्षक ांना प्रशिक्षणजि.प. शाळांतील विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिशमधून शिक्षण मिळावे, या हेतूने हा निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्पाने याची अंमलबजावणी केली जाईल. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच शाळा सुरू होताना पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती उकेश चव्हाण यांनी दिली. चौकट...तालुकानिहाय जि.प. शाळा१४२, हिंगणा १२८, कामठी ८२, काटोल १४४, नरखेड १२०, सावनेर १२३, कळमेश्वर ९०, रामटेक १४०, मौदा १२७, पारशिवनी १००, उमरेड १२८, कुही १४७ व भिवापूर १०९.