शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

जिओला दणका, समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याचा ट्रायचा आदेश

By admin | Updated: April 6, 2017 21:21 IST

प्राइम मेंबरशिप घेण्यासाठी जिओने दिलेली 15 दिवसांची वाढीव मुदत मागे घेण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओला दणका दिला आहे. प्राइम मेंबरशिप घेण्यासाठी जिओने दिलेली 15 दिवसांची वाढीव मुदत मागे घेण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत.  यासोबतच समर सरप्राइज ऑफरदेखील मागे घेण्यास सांगितलं आहे. जिओकडून ट्रायच्या या आदेशाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.  पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ज्या ग्राहकांनी आधीच या ऑफरसाठी नोंदणी केली आहे त्यांना याचा फटका बसणार नाही. 
हॅप्पी न्यू इयर ऑफर संपेपर्यंत अपेक्षेएवढ्या ग्राहकांनी प्राइम मेंबरशिपसाठी नोंदणी न केल्याने जिओने प्राइम मेंबरशिपसाठी 15 दिवसांची मुदत वाढवली होती. जिओकडून सर्व ग्राहकांना दररोज 1 GB मोफत डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती. 31 मार्च 2017 ही या ऑफरची अंतिम तारीख होती. मात्र, रिलायन्सने पुन्हा ही तारीख 15 एप्रिलपर्यंत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली.तसेच जिओची प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा केली होती.  तीन महिने मोफत डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना 15 एप्रिलपूर्वी प्राईम मेंबरशिप घेणं गरजेचं करण्यात आलं होतं. पण आता ट्रायच्या आदेशाने जिओला दणका बसला आहे. 
 
 
 
यापुर्वी सप्टेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओने मोफत 4G अनलिमिटेड डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंगची सेवा लाँच केली होती. वेलकम ऑफर असं या सेवेचं नाव होतं. 31 डिसेंबर 2016 ला ही ऑफर संपण्यापूर्वीच कंपनीने ही ऑफर वाढवून पुन्हा हॅप्पी न्यू इयर ही ऑफर लाँच केली. 
जिओ धमाका! आता येणार Jio चा स्वस्त 4G लॅपटॉप-
एकाहून एक सरस ऑफर आणून धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करणार आहे. जिओ आता स्वस्त लॅपटॉप आणणार असल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ लवकरच 4G सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे. जिओच्या या लॅपटॉपमध्ये 4G सिम कार्ड स्लॉट असल्याने इंटरनेटचा वापर यावर सहजशक्य होणार आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार,  Foxconn कंपनी हे लॅपटॉप बनवणार आहे. 13.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले यामध्ये असणार तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी एचडी कॅमेरा असणार आहे. याशिवाय स्लिम कि-बोर्ड असणार आहे. लॅपटॉपमध्ये इंटेल पेंटियम क्वाड-कोअर प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मेमरी असू शकते. 1.2 किलोग्राम इतकं या लॅपटॉपचं वजन असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून याबबात अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही.