मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची झोन कार्यकारिणी जाहीर
By admin | Updated: February 7, 2016 22:46 IST
जळगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन मंडळ शाखा कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा संघटनेचे राज्य उपसरचिटणीस एस.के.लोखंडे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यात संघटनेचे सन २०१५चा अहवाल मांडण्यात आला. संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. जमाखर्च मंजूर करण्यात येऊन संघटन वाढीकरिता प्रयत्न तसेच कर्मचार्यांचे न्याय मागण्या प्रश्न सोडवणे कामी आंदोलनात्मक दिशा ठरवण्यात आली. प्रसंगी सन २०१६ करिता जिल्हा कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्ष- सुनील वाडे, कार्याध्यक्ष- उमेश घुगे, उपाध्यक्ष- राजेश दाभाडे, पराग बडगुजर, सचिव चेतन तायडे, सहसचिव- राहुल कापुरे, संघटक- आर.एम.जाधव, एस.आय.नंगवाने, तुषार पाटील, प्रकाश बेंडाळे, दादा बावस्कर, कोषाध्यक्ष संजय सरताळे या
मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची झोन कार्यकारिणी जाहीर
जळगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन मंडळ शाखा कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा संघटनेचे राज्य उपसरचिटणीस एस.के.लोखंडे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यात संघटनेचे सन २०१५चा अहवाल मांडण्यात आला. संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. जमाखर्च मंजूर करण्यात येऊन संघटन वाढीकरिता प्रयत्न तसेच कर्मचार्यांचे न्याय मागण्या प्रश्न सोडवणे कामी आंदोलनात्मक दिशा ठरवण्यात आली. प्रसंगी सन २०१६ करिता जिल्हा कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्ष- सुनील वाडे, कार्याध्यक्ष- उमेश घुगे, उपाध्यक्ष- राजेश दाभाडे, पराग बडगुजर, सचिव चेतन तायडे, सहसचिव- राहुल कापुरे, संघटक- आर.एम.जाधव, एस.आय.नंगवाने, तुषार पाटील, प्रकाश बेंडाळे, दादा बावस्कर, कोषाध्यक्ष संजय सरताळे यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे संघटनेचे पदाधिकारी सुरेश गुरचळ, विजय तायडे, सिद्धार्थ साळुंखे, सुदेश सोनवणे, नयना सोनवणे, हेमांगिनी मौर्य व वितरण कंपनीचे अधिकारी यांनी अभिनंदन केले.