जि.प. सदस्याचा उपोषणाचा इशारा
By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST
चौकशीची मागणी : पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप
जि.प. सदस्याचा उपोषणाचा इशारा
चौकशीची मागणी : पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप नागपूर : कुही तालुक्यातील मांढळ येथील पाणीपुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, यासाठी २० फे ब्रुवारीपासून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षापुढे उपोषण करणार असल्याची माहिती सदस्य उपासराव भुते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुही पंचायत समितीच्या सभापती सुनीता पडोळे उपस्थित होत्या. २००६-०७ या वर्षात जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत या योजनेचे काम करण्यात आले. यावर ६५ लाखांचा खर्च झाला. परंतु मांढळ येथील नागरिकांना अद्याप पाणी मिळालेले नाही. या प्रकरणात पाणीपुरवठा समिती व पुरवठादार यांच्याविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु यातील दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही झालेली नाही. जि.प.च्या मागील सभेत हा मुद्दा उपस्थित करून विहीर बांधकाम, पााईप खरेदी यात अनियमितता झाल्याचे निदर्शनास आणले होते. अध्यक्ष निशा सावरकर यांनी ५ फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)