शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

झाकीर नाईकच्या व्हिडीओजची तपासणी

By admin | Updated: July 13, 2016 03:53 IST

डॉ. झाकीर नाईकचे फेसबुक, टिष्ट्वटर आणि युट्युबवरील फॉलोअर्स तसेच त्यांचे टीकाकार पोलिसांच्या रडारवर आहेत. तपास पथकाने सोशल साईट्सवरील नाईकच्या २०० पेक्षा जास्त व्हिडिओची पडताळणी केली आहे.

मुंबई : डॉ. झाकीर नाईकचे फेसबुक, टिष्ट्वटर आणि युट्युबवरील फॉलोअर्स तसेच त्यांचे टीकाकार पोलिसांच्या रडारवर आहेत. तपास पथकाने सोशल साईट्सवरील नाईकच्या २०० पेक्षा जास्त व्हिडिओची पडताळणी केली आहे.मुंबई पोलिसांकडून नाईक याच्या भाषणांची कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये विशेष शाखा, एटीएस, गुन्हे शाखा, सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांसहीत तपास यंत्रणा काम करत आहेत. विशेष शाखेच्या चौकशी पथकाने नाईकच्या पीस चॅनेलमधील कार्यालयातून काही डीव्हीडी, सीडीज जप्त केल्या आहेत. त्यामध्ये २००० साली केलेल्या भाषणांचा समावेश आहे. नाईक याने आपल्या भाषणादरम्यान हिंदू आणि इतर धर्मा$ंच्या देवतांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे की नाही, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यासाठी झाकीरच्या भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट तयार करण्यात आले आहे. याशिवाय, झाकीर नाईक याची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन देखील पोलिसांच्या रडारवर आहे. झाकीर नाईक ज्या पीस टीव्हीवर भाषण करतो, त्याचे प्रसारण करणाऱ्या केबल टीव्ही आॅपरेटर्सवर कारवाई करण्यात आली आहे. या आक्षेपार्ह भाषणांसंदर्भात आयबीने गृह मंत्रालयाला दीड वर्षांपूर्वीच माहिती दिली होती. (प्रतिनिधी)१४ जुलै रोजी नाईक हे कुलाबा कफपरेड येथील वर्ल्ड टे्रड सेंटरमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार आहे. त्यामुळे तेथे गर्दी जमण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र यावेळी नाईक आपली बाजू कशी मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांचे मौन : नाईक यांच्या डोंगरी येथील इस्लामिक रिसर्च फाऊण्डेशन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मौन बाळगले आहे. कार्यालयातील कामकाज सुरू आहेत. 2007 मधील ग्लासगो हल्यातील आरोपी सबील अहमद हा झाकीर नाईक याच्या भाषणांमुळे प्रेरित झाला होता, असे उघड झाले होते. दीड वर्षानंतरही गृह मंत्रालयानं नाईकवर कुठलीही कारवाई केली नाही. राज्यात नाईक विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. २०१३ मध्ये नाईकने गणेशोत्सवावेळी आक्षेपार्ह भाषण केल्याने सर्वत्र टीकेची झोड उठली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात कुर्ला, वेंगुर्ला व सावंतवाडीत गुन्हे दाखल झाले होते. त्यांना चौकशीसाठी बोलावले होते अशी माहितीही पोलिस चौकशीत समोर येत आहे.