शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी मुलींना 15 ऑगस्टच्या परेडपासून दूर ठेवा, दहशतवाद्यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 17:23 IST

काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या जाकिर मुसा नावाच्या दहशतवादी संघटनेनं शाळेत शिकणा-या मुलींवर 15 ऑगस्टच्या दिवशी होणा-या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकू नका, अशा प्रकारची धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे.

श्रीनगर, दि. 9 - काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या जाकिर मुसा नावाच्या दहशतवादी संघटनेनं शाळेत शिकणा-या मुलींवर 15 ऑगस्टच्या दिवशी होणा-या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकू नका, अशा प्रकारची धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून दहशतवाद्यांनी ही धमकी दिली असून, श्रीनगरमध्ये 15 ऑगस्टला होणा-या परेडपासून मुलींना दूर ठेवा, असा इशाराही दहशतवाद्यांनी पालकांना दिला आहे. जाकिर मुसा मेपर्यंत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. मात्र त्यानंतर त्यानं अल कायदाशी हातमिळवणी केली.  जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सुरक्षा जवानांनी चकमकीत अल कायदाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. मात्र अद्यापही दोन दहशतवादी लपून बसल्याचं समजल्यामुळे परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी वेढा घातला असून, सर्च ऑपरेशन सुरू आहे. तसेच पुलवामा जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, चकमकीत ठार करण्यात आलेले दहशतवादी अल कायदाशी संबंधित असून, जाकिर मुसाच्या नेतृत्वात ते सक्रिय होते. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून, जाहीद आणि इसहाक अशी त्यांची नावं आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदानं गेल्या काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये जम बसवण्यासाठी गजवत -ए- हिंद नावाची दहशतवादी संघटना स्थापन केली होती. तसेच मुसाला या भागाचं प्रमुख घोषित केलं होतं. सुरक्षा जवानांना त्रालमधल्या गुलाब बागमध्ये तीन दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एसओजी आणि सीआरपीएफनं संयुक्तरीत्या या परिसराला घेराव घातला. त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री महेबुबा मुफ्तीही पुलवामा जिल्ह्यात एका कार्यक्रमानिमित्तानं येणार होत्या. मात्र ऐन वेळी त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला.  काश्मीरमध्ये सध्या लष्कराचं ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. त्यात त्यांनी दहशतवाद्यांची एक यादी बनवली आहे. यादीनुसार दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन राबवून त्यांना कंठस्नान घालण्यात येत आहे. आतापर्यंत 115 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.