शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; इस्लामिक स्टेटचा कमांडर ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 11:38 IST

जवानांकडून इशफाक अहमद सोफीचा खात्मा

श्रीनगर: इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू ऍण्ड काश्मीरचा कमांडर इशफाक अहमद सोफीचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. झाकीर मूसासोबतच सोफी इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू ऍण्ड काश्मीरच्या (आयएसजेके) प्रमुख कमांडरपैकी एक होता. झाकीर मूसाला पकडण्यात अद्याप सुरक्षा दलांना यश आलेलं नाही. तो पंजाबमध्ये लपल्याचं वृत्त गेल्याच आठवड्यात आलं होतं. इशफाक अहमद सोफी जम्मू-काश्मीरच्या सोपोरचा रहिवासी होता. शोपियामध्ये झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला. तो दहशतवाद्यांमध्ये अब्दुल्ला भाई नावानं ओळखला जायचा. त्याच्याकडून शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला. सोफीला ठार करण्यात यश आल्यानंतर सोपोरच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी परिसरातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्याचे आदेश दिले. आज पहाटे सोपोरच्या अमशीपोरात सुरक्षा दलांची चकमक झाली. त्यात सोफीला कंठस्नान घालण्यात आलं. सोफी आयएसजेकेचा कमांडर होता. त्याच्याकडे काश्मीरमधल्या कारवायांची जबाबदारी होती. 2015 मध्ये तो हरकत-उल-मुजाहिदीन संघटनेसोबत काम करत होता. त्यानंतर तो 2016 मध्ये त्यानं आयएसजेकेमध्ये सामील झाला. याआधी सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत बुरहान वाणी गँगचा शेवटचा कमांडर लतिफ टायगर मारला गेला.  

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर