शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

खाण घोटाळ्यातून येडियुरप्पांची निर्दोष मुक्तता

By admin | Updated: October 26, 2016 12:32 IST

40 कोटींच्या खाण लाचखोरी प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता केली.

ऑनलाइन लोकमत 
बंगळुरू, दि. 26 -  40 कोटींच्या खाण लाचखोरी प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचाराचे आरोप झेलत असलेले भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
विशेष सीबीआय न्यायालयाने येडियुरप्पा यांच्यासोबत त्यांचे दोन मुलगे, जावई आणि जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांनाही सर्व  आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे. खाणकामांना परवानगी देण्यासाठी लाच स्वीकारल्याचे आरोप येडियुरप्पांवर करण्यात आले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2011 मध्ये त्यांची रवानगी बंगळुरूतील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. मात्र तीन आठवड्यांमध्येच त्यांची जामीनावर मुक्तता झाली होती.  
  लाचखोरीच्या आरोपांविरोधात  उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातून येडियुरप्पांना दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर सीबीआयने येडियुरप्पा,  त्यांचे दोन मुलगे बी.वाय. राघवेंद्र आणि बी.वाय. विजयेंद्र, जावई सोहन कुमार, जेएसडब्ल्यू स्टील कंपनी आणि तिच्या बेल्लारीस्थित चार कंपन्यांविरोधात लाचखोरीप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यांच्यावर गुन्हेगापी कट, फसवणूक, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले होते. 
(येडियुरप्पांकडे कर्नाटक भाजपचे अध्यक्षपद)
येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद सांभाळत असताना ते आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून चालवण्यात येत असलेल्या ट्रस्टला 40 कोटी रुपये देण्यात आल्याचे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले होते. तसेच ही रक्कम जेएसडब्ल्यू स्टीलची सहयोगी कंपनी असलेल्या साऊथ वेस्ट मायनिंग कंपनीकडून देण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले होते.  त्याशिवाय येडियुरप्पांच्या अन्य ट्रस्टनांही कोट्यवधीची रक्क देण्यात आल्याचा उल्लेख सीबीआयने आरोपपत्रातून केला होता.