शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

YouTube Channels Banned: फेक न्यूजवर मोदी सरकारची डिजिटल स्ट्राइक, 8 यूट्यूब चॅनेल्सवर कायमची बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 12:47 IST

चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी एका पाकिस्तानी चॅनेलसह 7 भारतीय यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे.

नवी दिल्ली: चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी केंद्र सरकारने यूट्यूब चॅनल्सवर पुन्हा एकदा कडक कारवाई केली आहे. कथितपणे अपप्रचार करणाऱ्या 8 यूट्यूब चॅनेलवर केंद्राने बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या 8 चॅनेल्सपैकी 7 भारतीय आणि 1 चॅनल पाकिस्तानी आहे. केंद्राने या कारवाईमागे राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेबाबत अपप्रचार करणाऱ्या यूट्यूब चॅनेलवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. आयटी नियम-2021 अंतर्गत हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

ज्या चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे त्यांना 144 कोटी व्ह्यूज आणि 85.73 लाख सबस्क्रायबर्स आहेत. या वाहिन्यांद्वारे  भारतविरोधी खोट्या बातम्या चालवल्या जात असल्याचे केंद्र सरकारने सांगितले. यापैकी काही YouTube चॅनेल भारतातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही केंद्राने निवेदनाद्वारे म्हटले आहे. निवेदनानुसार, “भारत सरकार धार्मिक स्थळे पाडण्याचे आदेश देऊ शकते; भारत सरकार देशात धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालणार आहे. भारतात धर्मयुद्धाची सुरुवात, अशा शीर्षकांसह सामग्री अपलोड करण्यात आली,'' अशी माहिती निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेला धोकाप्रतिबंधित यूट्यूब चॅनेल भारतीय सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीरबद्दल अपप्रचार करत असल्याचेही आयटी मंत्रालयाने म्हटले. या चॅनेलवर अपलोड केलेला मजकूर पूर्णपणे खोटा आणि संवेदनशील असल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताचे इतर देशांशी संबंध धोक्यात आले आहेत. या YouTube चॅनेलवर आयटी नियम-2000 च्या कलम 69A अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. या YouTube चॅनेलवर दर्शकांची दिशाभूल करण्यासाठी बनावट आणि खळबळजनक फोटोंचा वापर करण्यात आला, न्यूज अँकरची बनावट छायाचित्रे, काही टीव्ही न्यूज लोगोसह सामग्री अपलोड करण्यात आली.

आतापर्यंत 102 चॅनेल्सवरजारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, डिसेंबर 2021 पासून आतापर्यंत 102 यूट्यूब आधारित न्यूज-चॅनेल आणि सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय आयटी मंत्री अनुराग ठाकूर यांनी जुलैमध्ये लोकसभेत सांगितले की 2021-22 मध्ये 78 YouTube-आधारित न्यूज-चॅनेलवर बंदी घालण्यात आली होती. तसेच, 560 YouTube लिंक ब्लॉक करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबCentral Governmentकेंद्र सरकार