शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

आलिशान बंगला, महागड्य़ा गाड्या, 24 लाख रोख; यूट्यूबरच्या घरात सापडलं लाखोंचं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 15:10 IST

पोलिसांनी या छाप्यात यूट्यूबरच्या घरातून तब्बल 24 लाख रुपये जप्त केले आहेत.

उत्तर प्रदेशातील बरेली येथे रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी एका युट्युबरच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी या छाप्यात यूट्यूबरच्या घरातून तब्बल 24 लाख रुपये जप्त केले आहेत. रोकड जप्त केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. आयकर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रोख रक्कम जप्त केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, युट्युबरबद्दल अशी माहिती मिळाली होती की, त्याने चुकीच्या पद्धतीने लाखोंची रोकड घरात जमा केली आहे. त्यानंतर पोलिसांनी युट्युबरच्या घरावर छापा टाकला. तस्लीम असं आरोपी यूट्यूबरचं नाव आहे. शेअर बाजाराशी संबंधित माहिती तो आपल्या चॅनलद्वारे लोकांना देतो. बरेलीतील नवाबगंजमधील मिलक पिच्छवाडा गावात पोलिसांनी छापा टाकला. तस्लीम बीटेक पास आहे. तस्लीमवर बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचा आणि त्याच पैशातून आलिशान घर बांधल्याचा आरोप आहे. यासोबतच त्याच्याकडे आलिशान वाहनंही आहेत.

यूट्यूबर तस्लीम सांगतो की, बीटेकचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने ऑक्टोबर 2017 मध्ये यूट्यूबवर एक चॅनल तयार केले. युट्युबवरील एका चॅनलद्वारे तो शेअर बाजाराची माहिती देतो. त्याने चॅनलद्वारे 1.20 कोटी रुपये कमावले आहेत. यासोबतच 40 लाख रुपयांचा आयकरही जमा झाला आहे. वसूल केलेल्या 24 लाखांच्या रकमेबाबत तस्लीम सांगतो की, 24 लाखांपैकी 10 लाख त्याला लग्नात मिळाले. 

सध्या आयकर पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. यूट्यूबवर तस्लीमच्या चॅनेलचे 99 हजाराहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. तस्लीमने गावात आलिशान घर बांधले आहे. तसेच त्याच्याकडे महागड्या आहे. नबाबगंजचे स्टेशन प्रभारी राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्लीमच्या घरी अवैध पैसे असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांच्या छाप्यात घरातून 24 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

तस्लीमचा भाऊ फिरोज याने सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. आपल्या भावाला कटात अडकवले जात असल्याचे त्याने म्हटले आहे. फिरोजच्या म्हणण्यानुसार यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावले आहेत. फिरोजने सांगितले की यूट्यूबवर ट्रेंडिंग हब 3.0 नावाने एक चॅनेल आहे. यातून चांगले उत्पन्न मिळते. दुसरीकडे, तस्लीमचे वडील मौसम खान यांच्या म्हणण्यानुसार, मुलावर जे काही आरोप लावण्यात आले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.