शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

राष्ट्रध्वजाविरोधात बोलणाऱ्या महेबूबा मुफ्तींच्या पीडीपीच्या कार्यालयावर तरुणांनी फडकवला तिरंगा

By बाळकृष्ण परब | Updated: October 25, 2020 06:45 IST

Mahebuba Mufti News : श्रीनगरमध्ये पीडीपीच्या कार्यालयावर काही तरुणांनी तिरंगा फडकवला आहे. तसेच जम्मूमधील पीडीपीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याच्या आरोपी पीडीपीच्या नेत्यांनी केला आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख महेबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याबाबत केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, श्रीनगरमध्ये पीडीपीच्या कार्यालयावर काही तरुणांनी तिरंगा फडकवला आहे. तसेच जम्मूमधील पीडीपीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याच्या आरोपी पीडीपीच्या नेत्यांनी केला आहे.पीडीपीचे नेते फिर्दोस तक यांनी ट्विट करून हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. या  ट्विटमध्ये ते म्हणाले की, पीडीपीच्या जम्मू काश्मीरमधील कार्यालयावर हल्ला करण्यात आला. काही आक्रमक राष्ट्रवादी तरुण कार्यालयात घुसले. त्यांनी माझ्यावरही हल्ला केला.फिर्दोस पुढे म्हणाले की, जमाव आमच्या ऑफिसमध्ये घुसला. त्यांनी काही जणांना मारहाण केली. ते कार्यालयावर तिरंगा फडकवण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी आमच्याबाबत काही अपशब्दही उच्चारले. त्यांची ओळख पटू शकली नाही. पण ते उजव्या विचारांच्या संघटनांशी संबंधित लोक होते.

काय म्हणाल्या होत्या महेबूमा मुफ्तीजम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शुक्रवारी वादग्रस्त विधान केले होते. आम्हाला आमचा जम्मू-काश्मीर ध्वज परत मिळेपर्यंत तिरंगा ध्वज हाती धरणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. शुक्रवारी मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा देश, दोन ध्वजांचे राजकारण पुढे केले होते. सुरुवातीला मेहबुबा म्हणाल्या की, आम्ही कलम ३७० पुन्हा आणणारच आणि असे होईपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. यासोबतच मेहबुबा यांनी भारताच्या राष्ट्रीय ध्वजाबद्दल अपमानास्पद भाष्य केले. जेव्हा आमचा जम्मू काश्मीरचा झेंडा परत येईल तेव्हाच आम्ही तो (तिरंगा) ध्वजही घेऊ. तो ध्वज आमच्या आयुष्याचा एक भाग आहे, तो आमचा ध्वज आहे. या ध्वजासोबत आमचं नातं आहे असं मेहबुबा म्हणाल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांनीही असंच वादग्रस्त विधान केले होते, काश्मिरी लोकांना मोदी सरकारवर विश्वास राहिला नाही अशी लोकांची मानसिकता आहे. फाळणीच्या वेळी खोऱ्यातील लोकांना पाकिस्तानमध्ये जाणे सोपे होते, परंतु त्यांनी गांधींजींचा भारत निवडला होता मोदींचा भारत नाही. आज चीन दुसर्‍या बाजूने पुढे सरकत आहे. जर आपण काश्मिरींशी चर्चा केली तर बरेच लोक चीनने भारतात यावं असं म्हणतायेत. चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत असं फारुक अब्दुला म्हणाले होते.दरम्यान, महेबुबा यांच्या विधानावर संतप्त झालेले सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदल यांनी महेबुबा यांच्याविरूद्ध राष्ट्रीय सन्मान कायद्यासह कलम १२१, १५१, १५३ए, २९५, २९८, ५०४, ५०५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. विनीत जिंदल यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबूबा मुफ्ती यांच्या वादग्रस्त विधानाने लोकांना निवडून आलेल्या सरकारविरूद्ध भडकावले आहे. तसेच देशाच्या राष्ट्र ध्वजाचा अपमान केला. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीArticle 370कलम 370