शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाने अपघात केल्यास वडिलांना तीन वर्षे कैद !

By admin | Updated: August 4, 2016 05:44 IST

अल्पवयीन अपत्याने चालवून अपघात केल्यास पालकांना जबाबदार धरून त्याबद्दल त्यांना तीन वर्षांची कैद व २५ हजार रुपये दंड करून, त्याशिवाय संबंधित वाहनाची नोंदणी कायमसाठी रद्द

नवी दिल्ली : पालकांच्या नावावर असलेले वाहन त्यांच्या अल्पवयीन अपत्याने चालवून अपघात केल्यास पालकांना जबाबदार धरून त्याबद्दल त्यांना तीन वर्षांची कैद व २५ हजार रुपये दंड करून, त्याशिवाय संबंधित वाहनाची नोंदणी कायमसाठी रद्द करण्याची नवी तरतूद मोटार वाहन कायद्यात करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.भारतात दरवर्षी ५ लाख रस्ते अपघात होतात व त्यात १.५ लोकांचे हकनाक प्राण जातात. या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक सुरक्षित व्हावी, लोकांनी वाहने जबाबदारीने चालवावित आणि रस्ते अपघातांत जखमी/ मृत होणाऱ्यांना लवकर न्याय आणि भरीव भरपाई मिळावी यासाठी सध्याच्या मोटार वाहन कायद्यात दुरुस्त्या करण्याच्या विधेयकास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानुसार या कायद्याच्या एकूण २२३ पैकी ६८ कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे, तर २८ कलमे पूर्णपणे नव्याने समाविष्ट करण्यात येणार आहेत.सुधारित कायद्याच्या तरतुदींमध्ये ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणांत दोन लाख रुपये भरपाई देणे व अपघातात मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्याचा समावेश आहे. विविध प्रकारच्या वाहतूक गुन्ह्यांसाठी जे दंड सुचविलेले आहेत, त्याच्या दसपट दंड आकारण्याची मुभाही राज्य सरकारांना देण्याची तरतूद आहे. परिवहन विभागाकडून अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी सुधारित कायद्यात ‘ई-गव्हर्नन्स’वर भर देण्यात आला आहे. त्यानुसार शिकाऊ वाहन परवाना आॅनलाइन मिळेल, वाहन परवान्यांची मुदत अधिक केली जाईल व परिवहन परवान्यासाठी शिक्षणाची कोणतीही किमान अट असणार नाही. वाहन नोंदणी व परवाना प्रक्रिया अधिक समन्वित व्हावी, यासाठी ‘वाहन’ आणि ‘सारथी’ या ई-प्लॅटफॉर्मवरून या दोन्हींचे राष्ट्रीय रजिस्टर तयार करणेही प्रस्तावित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>रस्ते सुरक्षा व परिवहन क्षेत्रात या नव्या कायद्याने आजवरची सर्वात मोठी सुधारणा घडून येईल. हे कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत पुढील आठवड्यात येईल व देशात सुरक्षित आणि लोकस्नेही अशी परिवहन व्यवस्था निर्माण होण्यासाठी सर्व पक्ष त्यास पाठिंबा देतील, याची मला खात्री आहे. -नितीन गडकरी, केंद्रीय परिवहनमंत्री>दंड आकारणीचे नवे दरविनातिकीट प्रवास रु. ५००विनापरवाना वाहन रु. ५,०००विनापरवाना ड्रायव्हिंग रु. ५,०००ड्रंकन ड्रायव्हिंग रु. १०,०००मर्यादेबाहेर मालवाहतूक रु. २०,०००मर्यादेबाहेर प्रवासी रु. १,००० (प्रतिप्रवासी)सीटबेल्ट न लावणे रु. १,०००हेल्मेट न घालणे रु. १,००० (तीन महिने परवाना स्थगित)बेदरकार ड्रायव्हिंग रु. ५,०००विनाविमा गाडी चालविणे रु. २.०००>याखेरीज रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब अशा आपत्कालीन वाहनांना रस्त्यात वाट करून न देणाऱ्या वाहन चालकास १० हजार रुपयांचा दंड होईल.