शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

LOVE मध्ये या तरुणाने केला जिहाद

By admin | Updated: July 14, 2017 12:20 IST

संदीप काश्मीरमध्ये एका युवतीच्या प्रेमात पडला होता. तिच्यासोबत लग्न करता यावे यासाठी त्याने...

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 13 - मागच्या आठवडयात काश्मीर खो-यातून अटक करण्यात आलेला ‘लष्कर-ए-तैयबा’चा दहशतवादी संदीप शर्मा ऊर्फ  आदिलने दहशतवादासाठी नव्हे तर, प्रेमासाठी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे तपासातून समोर आले आहे. संदीप काश्मीरमध्ये एका युवतीच्या प्रेमात पडला होता. तिच्यासोबत लग्न करता यावे यासाठी त्याने धर्मपरिवर्तन करुन इस्लाम धर्म स्वीकारला. 
 
संदीप ज्या कंत्राटदाराकडे नोकरी करायचा त्याला तपासयंत्रणांनी ताब्यात घेतले असून, याच कंत्राटदाराने संदीपला नोकरीसाठी काश्मीरला पाठवले होते. संदीप वेल्डींगचे काम करायचा. त्याने संदीपसह आणखी दोघांना त्याच कामासाठी काश्मीरला पाठवले होते. 
 
काम संपल्यानंतर असीफ आणि योगेश उत्तरप्रदेशमध्ये परतले पण संदीप तिथल्या एका निवृत्त पोलीस अधिका-याच्या मुलीच्या प्रेमात पडला होता अशी माहिती कंत्राटदाराने दिली. संदीप दुस-या धर्मतील असल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी लग्नाला परवानगी नाकारली. त्यानंतर तिथल्या एका स्थानिक मशिदीत संदीपने इस्लाम धर्म स्वीकारुन आदिल हे नाव धारण केले. त्यानंतर त्याने मुस्लिम तरुणीशी विवाह केला. 
 
संदीपने वेल्डींगच्या कामाव्यतिरिक्त अधिक पैसे मिळवण्यासाठी अनंतनाग-पुलवामा या भागात ड्रायव्हींग सुरु केली. पण त्यातून त्याला दिवसाला फक्त 300 रुपये मिळायचे अशी माहिती तपास अधिका-याने दिली. या दरम्यान संदीप शकूर या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादाच्या संपर्कात आला. शकूरने संदीपला पैशांचे आमिष दाखवले  आणि त्याच्या वेल्डींगच्या कामाचा एटीएम लुटण्यासाठी वापर केला.  
 
आणखी वाचा 
 
दक्षिण काश्मीरमध्ये सहा पोलिसांची हत्या करणाऱ्या ‘लष्कर-ए-तैयबा’शी संबंधित गटाचा संदीप सक्रिय सदस्य होता. मुझफ्फरनगरचा संदीप कुमार शर्मा ऊर्फ आदिल व कुलगामचा मुनीब शाह या दोघांना अटक झाली आहे. आपल्या कारवाया तडीस नेण्यासाठी दहशतवादी संदीपचा वापर करून घेत.
 
त्याचे गुन्हेगारी आणि दहशतवाद यात लागेबांधेही उघडकीस आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये बँका लुटण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामागेही शर्माच्या गटाचा हात होता. तपासात त्याने काश्मीरमध्ये बँका आणि एटीएम लुटण्याच्या घटनाही समोर आल्या. या लुटीतून दहशतवादी स्वत:सह संघटनेसाठी पैसा जमा करायचे.