बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. दरम्यान, जनसुरज पक्षाचे संयोजक प्रशांत किशोर आणि भाजप नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाल्याचे दिसत आहे. बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जायस्वाल आणि आरोग्य मंत्री मंगल पांडे यांच्यानंतर आता बिहार भाजपचे माजी अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार संजय जयस्वाल पीके यांच्या निशाण्यावर आले आहेत. भोजपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पीके यांनी जयस्वाल यांना थेट आव्हान दिले आहे.
ते म्हणाले, 'जेव्हा एखाद्या कोल्ह्याचा मृत्यू येतो, तेव्हा तो शहराकडे धावतो. त्यांचे मोठे बंधू दिलीप जायस्वालही प्रचंड उड्या मारत होते, आता तेही हात जोडत आहेत. त्याचप्रमाणे हेही ४ दिवसांत थंड होतील. त्यांना हव्या तेवढ्या उड्या मारू द्या. एवढेच नाही, तर संजय जयस्वाल यांना आव्हान देत पीके म्हणाले, बिहार आणि दिल्लीत जायस्वाल यांचेच सरकार आहे. हिंमत असेल, तर मला तुरुंगात टाकून दाखवा.'
भाजप खासदारावर तेल चोरीचा आरोप करत प्रशांत किशोर म्हणाले, ते पेट्रोल चोरी करतात. आपल्या धंद्यासाठी 10 वर्षे फ्लायओव्हर होऊ दिला नाही, असे बेतिया तील जनता म्हणत आहे. आमच्यावरही केस टाका, मागे हटणार नाही.
महापालिकेवर बनावट बिले बनवल्याचा आरोप करत पीके म्हणाले, बेतियाच्या सर्व पेट्रोल पंप मालकांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. महत्वाचे म्हणजे, संजय जयस्वाल यांच्या पेट्रोल पंपावरून महापालिकेतील आणि सरकारी वाहनांमध्ये भरले जाणारे इंधन. १० लिटर तेलाचे बिल २० लिटर एवढे होते. आम्ही तर इथेच आहोत, हिंमत असेल तर आम्हाला तुरुंगात पाठवा.