शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

आपला आयुर्विमा झाला ६१ वर्षांचा,  देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 02:31 IST

‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ हे घोषवाक्य असणा-या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (एलआयसी) १ सप्टेंबर रोजी ६१ वर्षे पूर्ण केली असून, या काळात इन्शुरन्स व्यवसायामध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत.

मुंबई : ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ हे घोषवाक्य असणा-या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (एलआयसी) १ सप्टेंबर रोजी ६१ वर्षे पूर्ण केली असून, या काळात इन्शुरन्स व्यवसायामध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत. त्यामुळे उदारीकरणानंतर अनेक कंपन्या या क्षेत्रात आल्या असल्या तरी लोकांचा इन्शुरन्स म्हणताच आठवण होते एलआयसीची. एवढेच नव्हे, तर आता इतक्या इन्शुरन्स कंपन्यांचे पर्याय लोकांसमोर असले तरी एलआयसी हीच लोकांची पहिली पसंती असते.एलआयसीने २०१६-१७ च्या पहिल्या तिमाहीमध्ये आधारस्तंभ, आधारशिला, जीवन उमंग आणि प्रधानमंत्री व्यय वंदना या योजना आणल्या असून, आतापर्यंतच्या त्यांच्या योजनांची संख्या २३ आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि पेन्शन, आजार यासाठीच्याही एलआयसीच्या योजना अतिशय लोकप्रिय आहेत.त्यामुळे १९५६ साली अवघ्या ५ कोटी भांडवलावर उभ्या राहिलेल्या एलआयसीची मालमत्ता २५ लाख कोटी रुपयांची असून, त्यात उतरविलेल्या आयुर्विम्याची रक्कम २३ लाख २३ हजार ८०२ कोटी रुपये इतकी आहे. एलआयसीने २0१६-१७ या वर्षात २१५.५८ लाख क्लेम सेटल केले. त्यातील रक्कमच मुळी १ लाख १२ हजार ७०० कोटी रुपये आहे. आता पैशांचा भरणा करण्यासाठी एलआयसीचे अ‍ॅपही आले आहे. डेबिट व क्रेडिट कार्डाच्या आधारे त्यामुळे भरणा शक्य झाले आहे.१४ देशांमध्ये एलआयसीएलआयसीने आता संबंधित देशातील कंपन्यांच्या भागीदारीतून १४ देशांत पाय रोवले आहेत. नेपाळ, श्रीलंका, सिंगापूर, बांगलादेश, बहारीन, मॉरिशस, कतार, कुवेत, ओमान, फिजी आदी ठिकाणी आज एलआयसी आहे. आतापर्यंत या कंपनीने अनेक पुरस्कार व पारितोषिकेही मिळवली आहेत.