शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

तुम्हीही घेऊ शकता नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तू; १४ सप्टेंबरला ई लिलावाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 01:42 IST

शाली, चित्रे, सोने-चांदीचे रथ यांचा समावेश

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तूंची आॅनलाईन विक्री येत्या १४ सप्टेंबरला करण्यात येईल. नॅशनल मॉडर्न आर्ट गॅलरी या वस्तूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूू मांडल्या गेल्या आहेत. महागडी दुर्मिळ चित्रे, चांदी-सोन्याच्या भेटवस्तू शिवाय कलाकुसरीच्या वस्तू, शाली, पगडी फेट्यांची खरेदी सामान्यांना करता येईल. गॅलरीच्या संचालकांनी प्रत्येक वस्तूची किंमत ठरवली आहे. त्यापासुन पुढे बोली लावता येईल.देशात तसेच परदेशात पंतप्रधान मोदींना अनेक भेटवस्तू मिळाल्या. या भेटवस्तू विकून त्यातून देशाच्या तिजोरीत पैसे जमा करण्याचा अभिनव विचार पंतप्रधानांनी केल्यावर सांस्कृतिक मंत्रालयास तशी सूचना 'पीएमओ'ने केली.

वाराणसीच्या कलाकारांनी अत्यंत देखणी दोन चित्रे पंतप्रधानांना काढून दिलीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महात्मा गांधींची जिवंत भासणारी प्रतिमा कॅनव्हासवर चितारण्यात आली होती. या दोन्ही चित्रांची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. लिलाव प्रक्रियेत ही चित्रे सर्वाधिक महागडी आहेत. किमान सहा चांदीचे रथ, महाभारताच्या काळाची आठवण करुन देणारा श्रीकृष्ण-अर्जुन विराजमान असलेला सोन्याचा रथ, सोन्याचा मोर व ईशान्य भारतातील राज्यांनी दिलेल्या सुंदर पगड्याही महाग आहेत. असंख्य शाली, मूर्ती, चित्रे, वाद्ये मोदींना भेट मिळालीत. लोहापासून बनवलेला दणकट आरसादेखील मोदींच्या संग्रहात आहे. केरळमध्ये मोदींना तो भेट मिळाला होता. उत्तरेकडील राज्यांमध्ये शौर्य परंपरेचे प्रतीक असलेली अनेक शस्त्रेही मोदींना भेट मिळाली. तलवारी, गदा, धनुष्य बाण, पूजेचे साहित्य, देवी-देवतांच्या मूर्तीदेखील ई आॅक्शनमध्ये लोकांना खरेदी करता येती.

सांस्कृतिक मंत्रालयाच्या सूत्रांनुसार १४ सप्टेंबरपासून ई लिलाव सुरु होईल. दिवसभर ही प्रक्रिया चालेल. त्यानंतरही आवश्यकता भासल्यास मुदतवाढीचा निर्णय सांस्कृतिक मंत्रालय घेईल. १ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीला वस्तू खरेदी करता येणार नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी