शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:35 IST

काही दिवसापूर्वी तेज प्रताप यादव यांचा अनुष्का यादव यांच्यासोबत एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोनंतर त्यांना पक्षातून बाहेर काढले होते.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांची पक्षामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. तेजप्रताप यांनी त्यांच्या पर्सनल आयुष्याबाबत केलेल्या सोशल मीडिया पोस्टनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता तेज प्रताप यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये तेज प्रताप त्यांचे वडील लालू यादव यांच्या फोटोकडे पाहताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी एक इशारा दिला आहे.

ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...

या पोस्टमध्ये तेज प्रताप यादव यांनी लिहिले की, 'माझ्या शांततेला माझी कमजोरी मानण्याची चूक करणाऱ्यांनी असे समजू नये की मला तुमच्या कट रचल्याची माहिती नाही. तुम्ही सुरुवात केली आणि मी ती शेवट करणार. मी खोटेपणा आणि फसवणुकीचा हा चक्रव्यूह तोडणार आहे. तयार राहा, सत्य बाहेर येणार आहे. माझी भूमिका माझ्या प्रिय जनतेद्वारे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे ठरवली जाईल, कोणत्याही पक्षाद्वारे किंवा कुटुंबाद्वारे नाही...', असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

फोटो व्हायरल झाल्यानंतर केली कारवाई

यापूर्वी तेज प्रताप यादव यांनी लालू प्रसाद यादव यांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे त्यांचे वडील लालू यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अनुष्का यादव यांच्यासोबतचा फोटो आणि प्रेम व्यक्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर लालू यादव यांनी मोठी कारवाई करत तेज प्रताप यांना पक्ष आणि कुटुंबातून काढून बेदखल केले होते. तेज प्रताप यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.

पक्ष आणि कुटुंबातून काढून टाकल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी आरोप केला होता की, राजदमध्ये जयचंदसारखे काही लोक आहेत, यामुळे त्यांच्यासोबत राजकारण केले जात आहे. यावेळी त्यांची पत्नी ऐश्वर्या यांनी अनुष्का प्रकरणात तेज प्रताप यांच्यावर केलेली कारवाई फक्त दिखावा असल्याचे म्हटले होते. 'संपूर्ण कुटुंब यात सामील आहे. हे सर्व निवडणुकीसाठी केले जात आहे', असंही त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारण