शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आपमध्ये धुमश्चक्री; आज होणार फैसला

By admin | Updated: March 28, 2015 00:06 IST

केजरीवालांनी अंतर्गत लोकशाहीला तिलांजली देत सत्ता हस्तगत करण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांचे भवितव्य ठरविण्यासाठी शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असतानाच या दोघांनी शुक्रवारी एका पत्रपरिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ले करीत पक्षांतर्गत संघर्ष नव्या वळणावर नेऊन ठेवला आहे. केजरीवालांनी अंतर्गत लोकशाहीला तिलांजली देत सत्ता हस्तगत करण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. केजरीवाल गटाचा आरोपदिल्ली निवडणुकीत पक्षाचा पराभव व्हावा हाच उद्देश ठेवून भूषण व यादव यांनी कारवाया केल्या. आपमधून बाहेर पडलेल्या एव्हीएएम या गटाशी त्यांनी संबंध ठेवून २ कोटी रुपयांची बनावट देणगी मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, याकडे केजरीवाल गटाने लक्ष वेधले. राजीनामा दिलाच नाही? आम्ही पाच मागण्या पूर्ण करण्याबाबत पाठविलेले पत्र हेच आमचे राजीनामापत्र समजले जावे असे स्पष्ट केले होते. सध्या हेच पत्र राजीनामा म्हणून दाखविले जात आहे, असा दावा भूषण व यादव यांनी केला.तुमच्यासोबत काम करण्याऐवजी मी दिल्लीत ६७ आमदारांना घेऊन प्रादेशिक पक्षाची स्थापना करेन, असे केजरीवाल म्हणाले होते. ही कल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली? असा सवालही भूषण यांनी केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)दीर्घकाळ पक्ष चालवताना मी केजरीवालांच्या दोन कमतरता स्पष्ट केल्या होत्या. केजरीवालांचा निर्णय अंतिम असतो. वेगळा सूर लावणाऱ्यांसोबत ते काम करू शकत नाहीत, असे सांगताना भूषण यांनी इंदिरा गांधी यांच्या सरकारने लादलेली आणीबाणी आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या राज्यात झालेल्या दंगली ही दोन उदाहरणे दिली. यादव यांनी पक्षाला मिळालेल्या दोन कोटींच्या देणग्या आणि दिल्ली निवडणुकीच्या काळात एका उमेदवाराच्या गोदामात सापडलेल्या दारूच्या साठ्याबाबत अंतर्गत लोकपालांकडून चौकशीची मागणीही केली.आमची तत्त्वाची लढाईआम्ही एखादा प्रश्न उपस्थित केल्यास आमच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. आमची लढाई पक्षाची मूलभूत तत्त्वे कायम ठेवण्यासाठी आहे. पक्षाची घटना आपच्या वेबसाईटवरून काढली आहे.- योगेंद्र यादवकेजरीवालांनी गेल्या वर्षी दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आमदारांची शिकार करण्याचा प्रयत्न केला. कार्यकारिणीचा यास विरोध असतानाही केजरीवालांनी नायब राज्यपालांना पत्र पाठवून विधानसभा विसर्जित न करण्याची विनंती केली होती.- प्रशांत भूषणचर्चा रुळावर असताना अचानक काहीतरी घडले. त्यांनी यापुढे चर्चा सुरू ठेवणार नसल्याचे सांगितले. त्यांनी काय घडले ते देशाला सांगायलाच हवे-आशिष खेतान