Kangana Ranaut Priyanka Gandhi: 'संसदेच्या परिसरात माझी आणि प्रियांका गांधींची भेट झाली, तेव्हा इमर्जन्सी चित्रपट तुम्ही बघितला पाहिजे, असे म्हणाले', असे सांगत अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी या भेटीवेळी झालेल्या चर्चेची माहिती दिली.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ ते १९७७ या काळात देशात आणीबाणी लागू केली होती. आणीबाणीचा निर्णय आणि त्या काळात घडलेल्या घटनांवर इमर्जन्सी चित्रपट लवकरच पडद्यावर येत आहे. प्रियांका गांधी या इंदिरा गांधींच्या नात आहेत.
कंगना रणौत या सध्या इमर्जन्सी चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. एका मुलाखतीत त्यांना गांधी कुटुंबासोबत या चित्रपटाबद्दल काही बोलणं झालं का किंवा गांधी कुटुंबातील कोणी तुम्हाला भेटले का?, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
प्रियांका गांधी आणि कंगना रणौत यांची कशी झाली भेट?
कंगना रणौत म्हणाल्या, 'नाही. त्यांच्याकडून कोणीही माझ्याशी संपर्क केला नाही. पण, मी प्रियांका गांधींना संसदेमध्ये भेटले आणि त्यांनी माझी कामाबद्दल आणि माझ्या केसांबद्दल स्तुती केली.'
'मी त्यांना म्हणाले की, तुम्हाला माहिती आहे की, मी इमर्जन्सी चित्रपट बनवला आहे आणि तुम्ही तो बघितला पाहिजे. आणि त्या नम्रपणे म्हणाल्या की, ठीक आहे. कदाचित. मी त्यांना म्हणाले की, तुम्हाला हा चित्रपट नक्कीच आवडेल", असे कंगना रणौत यांनी सांगितले.
कंगना रणौत म्हणाल्या की, "इंदिरा गांधी यांची भूमिका खूप संवेदनशीलतेने आणि सन्मानाने साकारण्याचा प्रयत्न केला आहे. यात एक व्यक्ती आणि ती घटना पूर्ण सन्मानाने मांडण्यात आली आहे."
महिलेचा विषय असेल तेव्हा...
कंगना रणौत म्हणाल्या की, "मी अभ्यास करत असताना मला असले दिसले की, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरच जास्त लक्ष दिलं गेलं आहे. त्यांचे पती, मित्र आणि वादग्रस्त नाती. मी विचार केला की, एक व्यक्ती यापलीकडे काही असतो. मी विशेष लक्ष ठेवलं की या गोष्टींच्या खोलात जायचं नाही. जेव्हा महिलांचा विषय येतो, तेव्हा त्यांना नेहमी पुरुषांसोबतच्या नात्यांवरून किंवा खळबळजनक मुद्द्यांपर्यंत बंदिस्त करून ठेवलं जातं', असं कंगना रणौत म्हणाल्या.