रांची - स्वातंत्र्याला अनेक वर्षे उलटली तरी देशात अजूनही अनेक ठिकाणी सरंजामशाही वृत्ती जिवंत आहे. याचाच प्रत्यय देणारी घटना नुकतीच समोर आली आहे. झारखंडमधील कोडरमा येथून भुवनेश्वर येथे जात असताना दोन मजुरांना राजधानी एक्स्प्रेसमध्ये अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना घडली आहे. या मजुरांकडे कन्फर्म तिकीट असतानाही त्यांना ट्रेनमधून उतरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या मजुरांना त्यांची राजधानीमधून प्रवास करण्याची लायकी नसल्याचे सुनावण्यात आले. त्यानंतर पीडितांनी कोडरमा स्टेशन मास्तरांकडे तक्रार नोंदवली. ही तक्रार धनबाद रेल्वे मंडळाकडे वर्ग करण्यात आली आहे. मात्र आता रेल्वेने अशी घटना घडल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच मजुरांची ट्रेन चुकली होती असा दावा केला आहे.कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या देशात केवळ स्पेशल ट्रेन सुरू आहेत. त्यामुळे बरसोत येथील राहणाऱ्या दोन मजुरांनी कोडरमा येथून भुवनेश्वर येथे जाण्यासाठी राजधानी एक्सप्रेसच्या बी-२ कोचमधील दोन तिकिटे बुक केली होती. मजुरांनी सांगितले की, ३० डिसेंबरच्या सकाळी जेव्हा ते राजधानी एक्स्प्रेसमध्ये चढले तेव्हा टीटीईने त्यांना धक्के मारून कोडरमा स्टेशनवर उतरवले. टीटीईने आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली. तुम्ही सगळे लहान लोक आहात. तुमची राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याची लायकी नाही. जास्त बोलाल तर पाच हजार रुपये दंड ठोठावू, अशी धमकी टीटीईने दिल्याचा आरोप मजुरांनी केला. त्यानंतर या मजुरांनी स्टेशन मास्तर कार्यालयातील तक्रार वहीत तक्रार नोंदवली.रामचंद्र यादव आणि अजय यादव अशी तक्रारकर्त्या मजुरांची नावे आहेत. ते विजयवाडामध्ये पोकलेन ऑपरेटक म्हणून काम करतात. दरम्यान, कोडरमा स्टेशनवर झालेल्या या घटनेचे वृत्त रेल्वेने फेटाळून लावले आहे. डीआरएम धनबाद आशिष बंसल यांनी मजुरांची ट्रेन चुकली होती. सीसीटीव्हीमध्ये हे मजूर फूटओव्हरब्रिजवरून धावताना दिसत आहेत. तर ट्रेन रवाना होत असल्याचे दिसत आहे.
"राजधानीमधून प्रवास करण्याची लायकी नाही", तिकीट असतानाही टीटीईने मजुरांना ट्रेनमधून उतरवले
By बाळकृष्ण परब | Updated: January 1, 2021 11:18 IST
Indian Railway News : दोन मजुरांना राजधानी एक्स्प्रेसमध्ये अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना घडली आहे. या मजुरांकडे कन्फर्म तिकीट असतानाही त्यांना ट्रेनमधून उतरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राजधानीमधून प्रवास करण्याची लायकी नाही, तिकीट असतानाही टीटीईने मजुरांना ट्रेनमधून उतरवले
ठळक मुद्देझारखंडमधील कोडरमा येथून भुवनेश्वर येथे जात असताना दोन मजुरांना राजधानी एक्स्प्रेसमध्ये अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना घडली आहेया मजुरांकडे कन्फर्म तिकीट असतानाही त्यांना ट्रेनमधून उतरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहेमात्र आता रेल्वेने अशी घटना घडल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच मजुरांची ट्रेन चुकली होती असा दावा केला आहे