शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

आप सरकारला पोलिसांचे पूर्ण सहकार्य- राजनाथसिंग सुरक्षेला प्राधान्य : राज्यांच्या विकासामुळेच देशाचा विकास शक्य

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पूर्ण सहकार्य द्या, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. सांघिक सहकार्याचे वातावरण जपण्यासाठी पक्षभेद बाजूला सारत प्रत्येक राज्याला मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पूर्ण सहकार्य द्या, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. सांघिक सहकार्याचे वातावरण जपण्यासाठी पक्षभेद बाजूला सारत प्रत्येक राज्याला मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
दिल्लीत नवे सरकार स्थापन झाले आहे. दिल्लीच्या विकासासाठी मी पोलिसांच्या पूर्ण सहकार्याची अपेक्षा करतो, असे राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांच्या ६८ व्या स्थापनादिनाच्या पथसंचलन कार्यक्रमात म्हटले. कोणत्याही पक्षाचे सरकार असो, राज्यांचा विकास झाल्याखेरीज देशाचा विकास शक्य नाही. सांघिक सहकार्यातून भारताला जागतिक शक्ती बनवायचे असेल तर पक्षभेद बाजूला सारत सर्व राज्यांना पूर्ण सहकार्य द्यायला हवे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
-------------------
महिलांवरील अत्याचारामुळे मोदी व्यथित
दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेबाबत केले जात असलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत. केवळ दिल्लीतील जनतेचीच बाब नाही, तर पंतप्रधान कोणत्याही महिलेबाबत गुन्हा घडला की व्यथित होतात. दिल्लीसारख्या वैविध्यपूर्ण शहरामध्ये सुरक्षेचे काम अतिशय अवघड ठरते. विविध आव्हाने असतानाही दिल्लीचे पोलीस चांगली कामगिरी बजावत आहेत, असे सांगत त्यांनी प्रशंसाही केली.
-------------------------
पोलिसांना प्रतिमा जपण्याचे आव्हान
दिल्लीत वेगवेगळे समुदाय वास्तव्याला असून अगदी छोटी घटनाही राष्ट्रीय बातमी बनते. त्यापेक्षा मोठी घडामोड असेल तर आंतरराष्ट्रीय बातमी बनते. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातो. प्रतिमा जपण्यासाठी पोलीस दलाने सतर्कपणे काम करावे, असेही ते म्हणाले.