शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणुकांत आपने आणला भाजपच्या नाकात दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 06:12 IST

याचे कारण, फेब्रुवारी २०२१मध्ये झालेल्या सुरत महानगरपालिकेच्या निवडणुकीत दडलेले आहे. 

शांतीलाल गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कसुरत : सुरत जिल्ह्यावर आम आदमी पार्टीने लक्ष केंद्रित केले असून भाजपच्या नाकात दम आणला आहे. आपने जिल्ह्यात दिलेल्या १६ उमेदवारांपैकी, एकाने भाजपच्या दबावात येऊन उमेदवारी मागे घेतल्याचा आरोप आपने केला. नुकतीच आपचे प्रदेशाध्यक्ष व कतारगामचे उमेदवार गोपाल इटालिया व लिंबायत मतदारसंघातील उमेदवार पंकज तायडे यांच्या सभांमध्ये घुसून दगडफेक करण्यात आली. त्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले. एवढेच नव्हे तर अरविंद केजरीवाल यांच्या होणाऱ्या सभेलाही परवानगी नाकारण्यात आली. याचे कारण, फेब्रुवारी २०२१मध्ये झालेल्या सुरत महानगरपालिकेच्या निवडणुकीत दडलेले आहे. 

सुरतमध्ये ३५ टक्के मतदार पाटीदार आहे. भाजपचा मतदार असलेला हा समाज आंदोलनामुळे बिथरला. आंदोलनाचा प्रमुख हार्दिक पटेल सध्या भाजपमध्ये असला तरी आंदोलनाचे ब्रेन असलेले अल्पेश कथिरिया (वराछा) व गोपाल इटालिया (कतारगाम) हे दोघे या मतदारसंघातून लढत आहेत. 

यांच्या जागा धोक्यात...n कतारगाममधून विद्यमान मंत्री मोरडिया व वराछातील भाजपचे माजी मंत्री किशोर भाई कनानी यांच्या जागा धोक्यात आहेत. n आपमुळे  पाटीदार मतांची सरळ विभागणी होऊ शकते.  आपने जातीचे गणिते लक्षात घेऊन दिलेल्या उमेदवारांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. n पाटीदार मतांतील फूट टाळण्यासाठीच पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे आयोजन पाटीदार बहूल चार मतदारसंघासाठी केले आहे.

टॅग्स :GujaratगुजरातAAPआप