शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तुम्ही माझ्या आईची हत्या करीत आहात, तुम्ही मणिपूरमध्ये केरोसिन ओतले; राहुल गांधी यांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:11 IST

सैन्य एका दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करू शकते. सैन्याचा तुम्ही प्रयोग करत नाही. - राहुल गांधी

सुनील चावके/आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मणिपूरमध्ये आपल्या मातेच्या झालेल्या हत्येविषयी आपण आदराने बोलत आहे. माझी एक आई येथे बसली आहे, दुसऱ्या आईला तुम्ही मणिपूरमध्ये मारले आहे. जोपर्यंत तुम्ही हिंसा बंद करणार नाही, तोपर्यंत दररोज तुम्ही माझ्या आईची हत्या करीत आहात, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर लाेकसभेत केला.

सैन्य एका दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करू शकते. सैन्याचा तुम्ही प्रयोग करत नाही. कारण, तुम्ही भारताला मणिपूरमध्ये मारू इच्छिता. तुम्ही संपूर्ण देशात केरोसिन शिंपडत आहात. तुम्ही मणिपूरमध्ये केरोसिन ओतले आणि आग लावली. तेच तुम्ही हरयाणात करीत आहात. संपूर्ण देशाला जाळण्यात तुम्ही गुंतले आहात. संपूर्ण देशात तुम्ही भारतमातेची हत्या करीत आहात, असा आरोप राहुल यांनी केला.

मुलाला डोळ्यादेखत गोळ्या मणिपूरच्या मदत शिबिरामध्ये मी गेलो. माझ्या एकुलत्या एक छोट्या मुलाला डोळ्यादेखत गोळ्या घातल्याचे एका महिलेने तिथे सांगितले. रात्रभर त्याच्या प्रेतासोबत राहिल्यानंतर भीतीपोटी आपण अंगावरील कपड्यांनिशी घर सोडल्याचे सांगून तिने मुलाचा फोटो दाखवला. आपल्यापाशी आता एवढेच उरले आहे, असे ती म्हणाली. 

ओम बिर्ला  यांचे मानले आभारभाषणाच्या सुरुवातीला लोकसभेत सदस्यत्व पुनर्स्थापित केल्याबद्दल राहुल गांधी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले. आज अदानींवर बोलणार नसल्यामुळे माझ्या भाजपच्या मित्रांना घाबरण्याची गरज नाही. आज मी बुद्धीने नाही तर हृदयातून बोलणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.  राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान भाजपचे सदस्य वारंवार व्यत्यय आणत होते. ओम बिर्ला त्यांना वारंवार शांत राहण्याचे आवाहन करूनही सभागृहातील वातावरण तापले होते.

प्रक्षेपणावरून आरोप-प्रत्यारोपसंसदेत मणिपूरच्या मुद्द्यावर बुधवारी चर्चा सुरू होती. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी बोलण्यास प्रारंभ केला. त्यांच्या भाषणाच्या वेळी सभागृहात गदारोळ झाला. राहुल गांधी लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावर १५ मिनिट ४२ सेकंद बोलले. या कालावधीत संसद टीव्हीवर ११ मिनिट आठ सेकंद केवळ सभागृह अध्यक्ष ओम बिर्ला यांचा चेहरा दाखविण्यात आला, असा आरोप राहुल गांधी यांच्या भाषणानंतर काँग्रेसने केला आहे. 

केवळ चारच मिनिटे...राहुल गांधी यांना केवळ चार मिनिटे संसद टीव्हीवर दाखवण्यात आले, असाही काँग्रेसने आरोप केला आहे.  टीएमसीच्या लोकसभा खा. महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे की, जेव्हा भाजपचे नेते भाषण देत होते, तेव्हा संसद टीव्हीचा त्यांच्यावरील कॅमेरा हटत नव्हता; परंतु, विरोधी पक्षांची आघाडी इंडियाचे नेते बोलत होते, तेव्हा तातडीने लोकसभा अध्यक्षांना टीव्हीवर दाखविले जात होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNo Confidence motionअविश्वास ठराव