शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

योगाने संपूर्ण जगाला भारताबरोबर जोडले - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: June 21, 2017 09:45 IST

भारताबाहेर योगासने प्रचंड लोकप्रिय असून योगासनांमुळे संपूर्ण जग भारताबरोबर जोडले जात आहे.

 ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. 21 - आज योगा अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. भारताबाहेर योगासने प्रचंड लोकप्रिय असून योगासनांमुळे संपूर्ण जग भारताबरोबर जोडले जात आहे. मागच्या तीनवर्षात अनेक नव्या योगा संस्था आकाराला आल्याचा आनंद आहे. योग शिक्षकांची मागणी वाढत चालली आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगासनांचे महत्व विषद केले. ते तिस-या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने लखनऊमध्ये बोलत होते. 
 
पंतप्रधान मोदी यंदा लखनऊमध्ये योग दिवस साजरा करत असून, उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर मोदीं स्वत: योगासने करत आहेत. फक्त शारीरीक तंदुरुस्ती नव्हे निरोगी शरीस्वास्थय महत्वाचे आहे. योगामुळे आरोग्याची खात्री मिळते. योगासने करण्यासाठी जास्त खर्चही करावा लागत नाही. जेवणामध्ये जसे मीठ लागते तसेच योगाला आपल्या आयुष्याचा एक भाग बनवा असे आवाहन मोदींनी केले. 
 
 
देशभरात योग दिवस साजरा करणा-या सर्वांना मोदींनी यावेळी शुभेच्छा दिल्या. मुसळधार पाऊस कोसळल्यानंतरही मोठया संख्येने उपस्थित राहून योगदिन साजरा करण्याचा उत्साह दाखवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी उपस्थितांचे आभार मानले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईकही योग दिनाला उपस्थित आहेत. योगा शरीर, मन आणि आत्म्याला एकत्र आणते. आज भाषिक आणि सांस्कृतिक रेषा ओलांडून संपूर्ण जग योगामुळे एकत्र येत आहे. आज जगातील अनेक देशांना आपली भाषा, परंपरा, संस्कृती माहित नाही पण ते सर्व देश योगाच्या माध्यमातून आपल्याशी जोडले जात आहेत असे मोदी म्हणाले. आधी योगासने हिमालयातील साधूपर्यंत मर्यादीत होती पण आता ती सर्व सामान्यांच्या आयुष्याचा भाग बनली आहेत असे मोदी म्हणाले. 24 तास योगासने करण्याची आवश्यकता नाही. 50 ते 60 मिनिटे योगासने केली तरी, भरपूर आहे. 125 कोटी भारतीय आणि जगभरातील लोकांनी नियमित योगासने सुरु केली तर, मानवी विचारातून ज्या समस्या उदभवतात त्यावर मात करता येईल असे मोदी म्हणाले. मीठाचे उदहारण देऊन मोदींनी योगाचे महत्व विषद केले. मीठ जेवणात फक्त चवीसाठी नाही तर शरीर स्वास्थासाठी आवश्यक असते तसेच मीठा इतकेच योगा आयुष्यात महत्वाचे असल्याचे मोदींनी सांगितले.  
 
 
लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानावर हा कार्यक्रम होत आहे. आंबेडकर मैदानावरील या योग कार्यक्रमामध्ये 50 हजार नागरीक सहभागी झाले आहेत. योगाच्या माध्यमातून भारत नवी उंची गाठू शकतो असे मत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.