शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात 80 टक्के खत पडून

By admin | Updated: July 13, 2017 23:54 IST

खत विक्र ेते चिंतेत :पावसाअभावीपेरण्यालांबल्यानेबळीराजाहवालदिल

खत विक्र ेते चिंतेत :पावसाअभावीपेरण्यालांबल्यानेबळीराजाहवालदिलयेवला : (दत्ता महाले)येवला शहर व तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खत विक्र ेत्याचे खरेदी केलेल्या खतापैकी सुमारे ८० टक्के खते शिल्लक पडले आहेत. पावसाअभावी पेरण्या लांबत असल्याने शेतकर्यांनी खतेच उचलली नाहीत. शेतकर्यांनी पाऊस नसल्याने खते घालण्याचे नियोजन पुढे ढकलल्याने बहुतांशी विक्र ेत्याची गोदामे खतांनी तशीच भरलेली आहेत. पिके उतरून पडली आहे. लवकर पाऊस नाही पडला, तर या खतांचे करायचे काय, याच चिंतेत शहर व तालुक्यातील खत विक्र ेते आहेत.----------------पावसाने केला अपेक्षाभंगयंदा हवामान खात्याने जोरदार पावसाचीही शक्यता वर्तिवली होती. पहिल्या टप्प्यात पेरणी योग्य पाऊस झाला. पुढे देखील मोठा पाऊस पडेल या अपेक्षेने खतविक्र ेत्यांनी या वर्षीच्या पेरणीचा अंदाज घेत व वाढलेले मका, कपाशी, सोयाबीन, बाजरी, भुईमुग हे क्षेत्र पाहून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते खरेदी करून स्टॉक करून ठेवला. पिहल्या पंधरवाड्यात पावसाची भुरभुर होती. त्यामुळे तालुक्यातील 80 टक्के शेतकर्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र दुसर्या टप्प्यात पावसाचा काहीसा जोर चढेल असे वाटत असतानाच सर्वत्र कडक ऊन पडत असल्याने पेरण्यांची गती प्रचंड मंदावली. झालेल्या पेरण्याच संकटात आल्याने शेतकर्यांनी खतांकडे दुर्लक्षच केले. यामुळे खतांच्या दुकानांत शुकशुकाट पसरला. याचा परिणाम खत विक्र ेत्यांच्या जुलै मिहन्याच्या व्यवहारावर झाला आहे. जूनमध्ये शेतकर्यांनी खताची दुकाने फुललेली दिसली मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी खताच्या दुकानाकडे फिरकताना देखील दिसेना. या दिवसात नवी- जुनी देणी क्लीअर करून शेतकरी खते शेतात नेण्यासाठी धडपडत असतात. परंतु यंदा पाऊसच नसल्याने सगळ्या खतांच्या दुकानात शुकुशकाट आहे. परिणामी खतांची विक्र ी कशी करायची, या चिंतेत विक्र ेते आहेत. कोट्यावधी रु पयाची उलाढाल असणारा खते बि बीयाणाचा बाजार सध्या ठप्प आहे. लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचनेत असलेला शेतकर्याने बियाणे खरेदीसाठी हात आखडला आहे. आतापर्यंत केवळ 60 टक्केच बियाण्यांची विक्र ी झाल्याची माहीती बियाणे विक्र ेत्यांनी दिली. मागील वर्षी याच काळात जवळपास 85 टक्के बियाणाची विक्र ी झाली होती. पुन्हा एखादा दमदार पाऊस झाल्यानतंर शेतकरी बियाणे व खते खरेदीला प्रारंभ करतील त्यानंतरच गर्दी वाढेल अशी अपेक्षा खत विक्र ेत्यांना आहे. .गतवर्षी खरीप व रब्बी हंगामात चांगला पाऊस झाला. मात्र शेतकर्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला रास्त भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी पूर्णत: उध्वस्त झाला आहे. घेतलेले बँकांचे कर्जही परतफेड करू शकला नाही. यंदाच्या या अस्मानी संकटामुळे पुन्हा शेतकर्या समोर पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. हातात पैसा नाही आणि कर्जही मिळत नाही. अशा विवंचनेत शेतकरी आहे. खरीप हंगामासाठी मशागत करून शेती सज्ज आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. मागील वर्षी मृग नक्षत्रात 100 टक्के शेतकर्यांच्या पेरण्या आटोपल्या होत्या. यावर्षी मृग नक्षत्रात थोडाफार पावसाने शेतकर्याच्या आशा पल्लवित झाल्या व त्यांनी या तडाख्यात 80 टक्के पेरण्या केल्या. मात्र आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्र सध्या कोरडे जात असून उन्हाचा तडाखा कमी झाला नाही. त्यामुळे शेतकरी अद्यापही बी-बियाणे खरेदी करण्याच्या मानिसकतेत दिसत नाही. त्यामुळे कृषी केंद्र ओस दिसत आहेत. कृषी केंद्रचालकांनी उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात बियाण्यांचे बुकींग केले. कपाशी सोयाबीनच्या बियाण्यांनी कृषी केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र खरेदीसाठी शेतकरीच दिसत नाही. शेतकर्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. चार एकराच्या आतील शेतकरी वेळेवर खत बि बीयाणे खरेदी करतो. सध्या शेतकरी बी-बियाण्यांची चाचपणी करीत आहे. एखादा चांगला पाऊस झाला म्हणजे खते बियाणे खरेदीला वेग येईल. सध्यातरी शेतकर्यांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसत नाही.-----------जूनच्या पहिल्या पंधरवड्यात आमची गोदामे मोकळी होतात. पण सध्या पाऊस नसल्याने खतांची मागणी क्वचितच होत आहे. जूनच्या मागणीच्या तुलनेत दहा टक्केही मागणी नाही. यामुळे आमच्या अर्थकारणावरच परिणाम झाला आहे. त्यात नोटबंदी व शेतमालाचा भाव गडगडला आणि जीएसटी मुळे शेतकरी हैराण झाला असून कदाचित पाऊस पडल्यानंतरच खते करण्याच्या मानिसकतेत आहे. प्रदीप जाधव, संचालक भारत सीड्स, येवला.=====================================शेतकर्यांना जीएसटी मुळे खतांच्या किमत्तीवर 7 टक्के कार आकाराला जात होता.परंतु जीएसटी लागू झाल्यानंतर 5 टक्के कार आकारणी झाली.खतांच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्याने,शेतकर्यांना अल्पसा दिलासा मिळाला असला तरी नोटबंदी,शेतमालाला भाव नाही,त्यामुळे पैसा हाती नाही.शिवाय पाऊस नाही त्यामुळे खतांच्या दुकानात शेतकरी दिसत नाही.