शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाची लोकसभा निवडणूक जणू तीर्थयात्राच होती - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 06:38 IST

रालोआतील ३६ घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.

- नितीन अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लोकसभा निवडणुकांत बहुमत मिळेल, असे निष्कर्ष एक्झिट पोलमधून आले असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे हस्तांदोलन करून आभार मानले. भाजपच्या मुख्यालयात झालेल्या या समारंभाला रालोआतील घटक पक्षांचे सर्व नेतेही उपस्थित होते. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी हा आभार प्रदर्शन सोहळा आयोजित केला होता.

शिवसेनेचे उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम, अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर, लोक जनशक्ती पार्टीचे राम विलास पासवान, रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले, अपना दलाच्या अनुप्रिया पटेल, तसेच भाजपचे अरुण जेटली, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, जे. पी. नड्डा आदी सारेच मंत्री व बडे नेते या समारंभाला उपस्थित होते. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी नंतर भोजन समारंभही ठेवला होता. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी केवळ भाजपच्या नव्हे, तर मित्रपक्षांच्या मंत्र्यांचेही नाव घेऊन आभार मानले. तसेच गेली पाच वर्षे साथ देणाऱ्या वरील सर्व पक्षांविषयीही कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यावेळी रालोआतील ३६ घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. आणखी तीन पक्षांनी लेखी समर्थन कळवले आहे. यावेळी सर्व पक्षांनी केंद्रात पुन्हा रालोआचे मजबूत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखविला.

या समारंभानंतरच्या भोजनालाही हे सारे नेते हजर होते. त्याआधी सरकारच्या पाच वर्षांतील कार्याचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. आपण अनेक निवडणुका पाहिल्या. पण मला या निवडणुकांत कुठेच राजकारण दिसले नाही. लोकांनी स्वत:हून आपल्याला मते देण्याचे ठरविले होते व तेच आपला प्रचार करीत होते. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे माझ्यासाठी जणू तीर्थयात्राच होती, असा दावा मोदी यांनी केला. या समारंभावेळी नितीश कुमार यांनी बिहारला विशेष दर्जा व अधिक निधी देण्याची विनंती पंतप्रधानांना केल्याचे समजते.

नवीनबाबूंचा पाठिंबाबिजू जनता दलानेही मोदी सरकारला पाठिंबा देण्याचे ठरविल्याचे समजते. त्या पक्षाचे नेते अमर पटनायक म्हणाले की, केंद्रात जे सरकार येईल, त्याला आम्ही सहकार्य करू. अर्थात ओडिशाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राने आम्हाला सहाय्य करावे. त्यांनी स्पष्टपणे भाजपचे नाव घेतले नाही. पण ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आता रालोआला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदी