शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 11:14 IST

जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिकला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने फुटीरतावाद्यांची सरकारी सुरक्षा काढून घेतल्यानंतर आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिकला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने फुटीरतावाद्यांची सरकारी सुरक्षा काढून घेतल्यानंतर आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे. यासिनच्या अटकेनंतर जम्मू-कश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी समर्थक पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. 

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिकला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने फुटीरतावाद्यांची सरकारी सुरक्षा काढून घेतल्यानंतर आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे. यासिनच्या अटकेनंतर जम्मू-कश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी समर्थक पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. 

जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या संविधान कलम 35-Aवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर सुनावणीच्या आधी यासिनला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 35-A कलमाअंतर्गत जम्मू-कश्मीरमध्ये इतर कोणत्याही राज्यातील वा राष्ट्रातील व्यक्तीला अचल संपत्ती खरेदी करण्यास मनाई आहे. संविधानाच्या याच कलमाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे. न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

काश्मीरमधील फुटीरतावादी नेते पाकिस्तान सरकारशी संपर्कात असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारनं त्यांच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून राज्यातील पोलीस व निमलष्करी दलाला अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारनं काही फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. संरक्षण काढून घेण्यात आलेल्या नेत्यांमध्ये मीरवाइझ उमर फारुख, अब्दुल गनी बट्ट, बिलाल लोनस हाशमी कुरैशी आणि शब्बीर शाह यांचा समावेश आहे. या नेत्यांमध्ये यासिन मलिकचाही समावेश होता. या नेत्यांपैकी मीवराइझ उमर फारुख हा हुर्रियत कॉन्फ्ररन्स या फुटीरतावादी पक्षाचा चेअरमन आहे.  या नेत्यांना देण्यात आलेले सरकारी संरक्षण काढतानाच त्यांना मिळणाऱ्या इतर सरकारी सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

भारताने पाकसोबत युद्धाच्या प्रश्नाचे पाहावे; फुटीरतावाद्याच्या उलट्या बोंबा

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावर अब्दुल गनी बट्ट याने आपल्याला सुरक्षेची गरजच नव्हती, त्यामुळे सुरक्षा काढून घेतल्याने काही फरक पडणार नाही, अशा उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. तसेच भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यताही त्याने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली आहे. अब्दुल गनी बट्ट याने एएनआयला दिलेल्या माहितीमध्ये त्याने आपल्याला सुरक्षा राज्य सरकारने पुरविली होती. आपल्याला या सुरक्षेची गरज नव्हती. काश्मीरी जनताच आपली सुरक्षा आहे. आधी पाकिस्तान आणि भारताने त्यांचा युद्धाचा प्रश्न सोडवावा, अशी फुशारकी मारली आहे.

टॅग्स :ArrestअटकJammu Kashmirजम्मू-काश्मीर