शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या व्यासपीठावर यशवंत सिन्हा नाहीत? पीएमओतून आले शिष्टाचार पालनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:37 IST

१४ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या पाटणा विद्यापीठाच्या शतक महोत्सवी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून, या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांना मात्र व्यासपीठावर स्थान मिळणार नसल्याचे समजते.

हरीश गुप्तानवी दिल्ली : १४ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या पाटणा विद्यापीठाच्या शतक महोत्सवी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून, या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांना मात्र व्यासपीठावर स्थान मिळणार नसल्याचे समजते़मोदी यांच्या या दौ-यात शिष्टाचाराचे पालन केले गेले पाहिजे, असे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले असल्याचे समजते. तशा सूचना संबंधितांना दिल्या गेल्या आहेत़ मोदी यांच्यासमवेत व्यासपीठावर फक्त आवश्यक तेवढ्याच सन्माननीय व्यक्ती असतील, असे सांगण्यात आले आहे़ आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, अन्नपुरवठामंत्री रामविलास पासवान, आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे आदी हे या विद्यापीठाचे विद्यार्थी असून, त्यांनाही या कार्यक्रमास बोलावण्यात आले आहे. माजी केंद्रीय आरोग्य मंत्री व विद्यमान राज्यसभा सदस्य सी. पी. ठाकूर हेही विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. यशवंत सिन्हा यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती़ त्याला शत्रुघ्न सिन्हा यांनीही पाठिंबा दिला होता़ त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने दोघांना व्यासपीठापासून दूर ठेवण्याच्या सूचना केल्याचे कळते़आयोजकांची होणार पंचाईत-शिष्टाचारानुसार व्यासपीठावर मोजक्याच खुर्च्या असतील. त्यात पंतप्रधान, राज्यपाल सतपाल मलिक, मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, जे. पी. नड्डा, चौबे यांचा समावेश आहे.दोन्ही सिन्हांना महत्त्वाचे स्थान मिळणार की नाही आणि सी. पी. ठाकूर यांना कोठे सामावून घेणार का, हे स्पष्ट नाही. यशवंत सिन्हा व शत्रुघ्न सिन्हा यांना व्यासपीठावर उपस्थित राहावे अशी विनंती या दोन नेत्यांना करणाºया आयोजकांचीच पंचाईत होणार आहे.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाNarendra Modiनरेंद्र मोदी