शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

येत्या 15 दिवसांत टोमॅटो होणार स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 20:13 IST

टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या स्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

ठळक मुद्देयेत्या 15 दिवसांत टोमॅटोच्या दरात मोठी कपात होईलदक्षिण आणि अन्य राज्यांतून टोमॅटोची आवक येत्या काळात वाढणार असल्याचंही समजतं आहे. टोमॅटोच्या टंचाईमुळे सद्या हे दर 100 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.

नवी दिल्ली, दि. 30 - टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या स्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र येत्या 15 दिवसांत टोमॅटोच्या दरात मोठी कपात होईल, असे मत भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) मांडलं आहे. दक्षिण आणि अन्य राज्यांतून टोमॅटोची आवक येत्या काळात वाढणार असल्याचंही समजतं आहे. टोमॅटोच्या टंचाईमुळे सद्या हे दर 100 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशाच्या अनेक भागात टोमॅटोचे दर एक महिन्यापासून गगनाला भिडलेत. किरकोळ विक्रीत हे दर किमान 100 रुपये किलो आहेत. मंत्रालयाच्या 29 जून रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत 92 रुपये किलो, कोलकात्यात 95 रुपये, मुंबईत 80 रुपये आणि चेन्नईत 55 रुपये किलो असे दर आहेत. अन्य शहरात लखनऊमध्ये 95 रुपये, भोपाळ व तिरुवनंतपुरम 90 रुपये, अहमदाबाद 65 रुपये, जयपूर 60 रुपये, पाटणा 60 रुपये आणि हैदराबाद 55 रुपये किलो असे दर आहेत.ज्या भागात टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन होते त्या भागातही दर वाढलेले आहेत. शिमला येथे 83 रुपये, बंगळुरुत 75 रुपये किलोने विक्री होत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (फलोत्पादन विभाग) ए. के. सिंह यांनी सांगितले की, दक्षिण आणि अन्य उत्पादक राज्यांतून आवक वाढल्यानंतर येत्या 15 दिवसांत टोमॅटोचे दर खाली येतील. आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांतून आवक वाढू शकेल. त्यामुळे साहजिकच दर कमी होतील. सिंह यांनी सांगितले की, मध्य प्रदेश आणि राजस्थान व अन्य उत्पादक राज्यांत झालेल्या मुसळधार पावसाने टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. तसेच मालवाहतुकीशी संबंधित काही समस्यांमुळे टोमॅटो वेळेवर बाजारात आले नाहीत.पाऊस आणि पूर यामुळे भाजी मंडईत भाजीपाला घेऊन येण्यासाठी वेळ तर लागत आहे. दिल्ली टोमॅटो मर्चेंट असोसिएशनचे अशोक कौशिक यांनी सांगितले की, मालवाहतुकीसाठी अधिक वेळ लागत असल्याने खर्चात वाढ होत आहे. येत्या दोन आठवड्यांत आवक वाढू शकेल. 2016-17 या वर्षात म्हणजेच जुलै ते जून या काळात देशात टोमॅटोचे उत्पादन 15 टक्के अधिक 187 लाख टन होण्याची शक्यता आहे. मात्र, सद्याच्या नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतरच वास्तविक आकडेवारी समोर येईल.