नवी दिल्ली : पक्षविरोधात कारवाई करण्याचा ठपका ठेवत अखेर बंडखोर नेते प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांच्यासह आनंद कुमार आणि अजित झा यांची आम आदमी पार्टीने पक्षातून हकालपट्टी केली. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या या चौघांना पक्षाने शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्याचे कारण देत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे पक्षाने सोमवारी रात्री उशीरा काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
यादव, भूषण यांची ‘आप’मधून हकालपट्टी
By admin | Updated: April 21, 2015 05:55 IST