शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादेतील ‘एक्स’ चिन्ह घबराटीचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:44 IST

अहमदाबाद शहरात बहुसंख्य हिंदू असलेल्या काही वसाहतींतील मुस्लिम कुटुंबांत त्यांच्या घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘एक्स’ असे चिन्ह असल्याचे पाहून रविवारी सकाळी घबराट निर्माण झाली होती.

ठळक मुद्दे राज्यात पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत असून त्या पार्श्वभूमीवर ‘एक्स’ चिन्ह लिहिण्यामागे त्या भागातील मुस्लिमांची ओळख पटण्याचा स्पष्ट उद्देश असल्याचे रहिवाशांनी पत्रात म्हटले होते.

अहमदाबाद : अहमदाबाद शहरात बहुसंख्य हिंदू असलेल्या काही वसाहतींतील मुस्लिम कुटुंबांत त्यांच्या घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘एक्स’ असे चिन्ह असल्याचे पाहून रविवारी सकाळी घबराट निर्माण झाली होती. चौकशीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वच्छता विभागाने ते चिन्ह रंगवले होते, असे स्पष्ट झाले. पालदी भागातील अशा एका वसाहतीतील काही रहिवाशांनी सोमवारी निवडणूक आयोग आणि शहर पोलिस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर पोलिस विभागाने तत्काळ तपास केला. राज्यात पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत असून त्या पार्श्वभूमीवर ‘एक्स’ चिन्ह लिहिण्यामागे त्या भागातील मुस्लिमांची ओळख पटण्याचा स्पष्ट उद्देश असल्याचे रहिवाशांनी पत्रात म्हटले होते. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर असे म्हटले आहे की ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमवर आधारीत असलेली कचरा गोळा करणारी यंत्रणा ज्या वसाहतींत पोहोचवायची त्यांची ओळख पटण्यासाठी ते चिन्ह रंगवण्यात आले आहे. अहमदाबाद महानगरपालिका कर्मचाºयांनी सोमवारी त्या भागाला आमच्यासह भेट देऊन रहिवाशांना ते आमच्या कचरा गोळा करण्याच्या प्रकल्पाचा भाग आहे, असे सांगितले, अशी माहिती पालदीचे पोलिस निरीक्षक बी. एस. राबडी यांनी दिली.