शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

चुकीचे मेसेज रोखणारा कायदा लोकसभा निवडणुकीआधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 04:36 IST

समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) येणाऱ्या खोट्या बातम्या-सूचना आणि चिथावणी देणारे संदेश प्रभावीपणे रोखण्यासाठी सरकार कायदा करण्याच्या तयारीत आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली  - समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) येणाऱ्या खोट्या बातम्या-सूचना आणि चिथावणी देणारे संदेश प्रभावीपणे रोखण्यासाठी सरकार कायदा करण्याच्या तयारीत आहे. यासाठी मसुदा बनवण्याची काम सुरू केले आहे. हा कायदा आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी लागू केला जाईल, अशी आशा आहे.या कायद्याने जर सोशल मीडियावर आलेल्या एखाद्या संदेश-सूचनेने कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार असेल तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कोणत्या प्रकारची पावले उचलावीत? त्यांच्याकडून काय कारवाई केली जाईल? हे निश्चित केले जाणार आहे.या नियोजित कायद्यात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सूचना केल्या जातील. चुकीचा-खोटा-तणाव निर्माण करणारा संदेश कसा ओळखावा, त्याबाबत लोकांना कसे जागरूक करावे, हे लोकांना सांगितले जाईल.एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला की, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय या सगळ्या मुद्द्यांवर गृह मंत्रालयासोबत कायदा व माहिती व प्रसारण मंत्रालयाचाशी चर्चा करीत आहे. यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि इंटरनेट आधारित माध्यमांना निर्देश दिले जातील की कोणत्याही संकटमय परिस्थितीत किंवा हिंसक स्थितीत प्लॅटफॉर्मवर सावधगिरीचे कोणते उपाय योजावेत किंवा कोणती पावले उचलावीत. फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप, टिष्ट्वटर, टेलिग्रामसह इतर सगळे सोशल मीडिया अ‍ॅप आणि वेबसाईट याच्या कार्यकक्षेत असतील.सोशल प्लॅटफॉर्म्सकडून सहकार्याची गरजएक अधिकारी म्हणाला, पारदर्शकतेच्या नावावर सरकारला निगराणीची परवानगी दिली जाऊ शकत नाही. परंतु, त्यासोबत सोशल मीडियालादेखील याच शब्दाच्या निमित्ताने त्याच्या जबाबदारीपासून वेगळे केले जाऊ शकत नाही.आम्हाला याबाबतील सोशल प्लॅटफॉर्मकडून सहकार्याची अपेक्षा आहे. चुकीचे मेसेज नेमके कुणी पोस्ट केले हे शोधता यावे यासाठी या कंपन्यांनी देशात एक तक्रार अधिकारी नियुक्त करावा. त्याची जबाबदारी अशी असावी की त्याने कायदा यंत्रणा-सरकारच्या मागणीनुसार अशा संदेशाची खातरजमा करून किमान वेळेतसगळ्यात आधी तो संदेश सोशल मीडियावर प्रसारित करणाºया व्यक्तीला ओळखून काढावे. त्याची माहिती कायदा राबवणाºया संस्था-सरकारला द्यावी.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपMessengerमेसेंजरGovernmentसरकार