शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

७५० रुपये लिहून, २०० देतात; ‘मनरेगा’ मजुरांच्या व्यथेने राहुल गांधींना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 06:59 IST

‘मनरेगा’ मजुरांच्या व्यथेने राहुल गांधींना धक्का; भारत न्याय यात्रा ओडिशात

राऊरकेला (ओडिशा) : ‘आम्ही मनरेगाच्या कामावर मजुरी करतो; परंतु आम्हाला वेळेवर त्याचे पैसे मिळत नाहीत,’ अशी खंत जेव्हा मनरेगाच्या मजुरांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवादादरम्यान व्यक्त केली तेव्हा त्यांना धक्का बसला. ‘भारत जोडो न्याय यात्रे’निमित्त राज्यात आलेल्या राहुल गांधी यांनी या मजुरांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्थानिक महिला मजुरांशी संवाद साधला. ‘कंत्राटदार काम करून घेतात; पण पैसे वेळेवर देत नाहीत. मी ३०-३५ दिवस काम केले. त्यानंतर आता एक वर्ष झाले तरी त्याचे पैसे मिळाले नाही. कंत्राटदार बाहेरून मजूर आणतात, त्यामुळे आम्हाला काम मिळत नाही. डायरीत ७५० रुपये दिल्याची नोंद करतात; पण प्रत्यक्षात २०० रुपयेच देतात,’ अशी खंत एका महिलेने व्यक्त केली. यासंदर्भातील व्हिडीओ काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया एक्सच्या खात्यावर शेअर केला असून, त्यात हा अन्याय असल्याचे म्हटले आहे. आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ, असेही त्यात म्हटले आहे.

भाजप-बीजेडीची भागीदारी‘ओडिशात भाजप आणि बिजू जनता दलाची (बीजेडी) ‘भागीदारी’ आहे आणि काँग्रेस राज्यातील लोकांचे हित जपण्यासाठी त्यांना विरोध करीत आहे,’ असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ते म्हणाले, ‘तुम्हाला माहीत आहे की नवीन पटनायक ओडिशात भागीदारीचे सरकार चालवतात.ते दोघेही हातमिळवणी करून काम करतात. मला संसदेत आढळले की बीजेडी भाजपला समर्थन देते. बीजेडीचे लोकही आम्हाला भाजपच्या सांगण्यावरून त्रास देतात. केवळ काँग्रेस पक्षच ओडिशातील लोकांसाठी बीजेडी-भाजप युतीला विरोध करीत आहे.’

३० लाख लोकांचे उपजीविकेसाठी स्थलांतर‘राज्यातील सुमारे ३० लाख लोक उपजीविकेसाठी इतर राज्यांत स्थलांतरित झाले आहेत, तर ३० कोट्यधीश राज्यांची संपत्ती लुटण्यासाठी येथे ओडिशाच्या बाहेरून आले आहेत,’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLabourकामगारWomenमहिला