शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

...तर छातीवर गोळ्या झेलू! माजी आयपीएस अधिकाऱ्यावर कुस्तीपटू बजरंग पुनियाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 10:18 IST

दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचे तंबू पोलिसांनी उखडून फेकले आहेत. कुस्तीपटूंना आता पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करू दिले जाणार नाही.

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचे तंबू पोलिसांनी उखडून फेकले आहेत. कुस्तीपटूंना आता पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करू दिले जाणार नाही. त्यांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली तर त्यांना याऐवजी दुसरे ठिकाण दिले जाऊ शकेल, असे दिल्ली पोलिसांनी सोमवारी स्पष्ट केले. या दरम्यान, रविवारी कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यात आले तेव्हा बजरंग पुनियाने ‘आम्हाला गोळी मारा’ असे म्हटले होते. त्यावर एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने वादग्रस्त व्यक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटले आहे.

जंतरमंतरवर आंदोलनाची परवानगी नाहीकुस्तीपटूंना आता पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करू दिले जाणार नाही. त्यांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली तर त्यांना याऐवजी दुसरे ठिकाण दिले जाऊ शकेल, असे दिल्ली पोलिसांनी सोमवारी स्पष्ट केले. 

‘पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू’!“गरज पडल्यास आम्ही गोळी मारू. पण, तुमच्या म्हणण्याने नाही. आता केवळ कचऱ्याच्या पिशवीप्रमाणे ओढून तुम्हाला फेकून दिले आहे. पोलिसांना कलम १२९ नुसार गोळी मारण्याचा अधिकार आहे. ती इच्छादेखील योग्य परिस्थितीत पूर्ण होईल. पण हे जाणून घेण्यासाठी शिकणे आवश्यक आहे. पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू! डॉ. एन. सी. अस्थाना, माजी आयपीएस

७०० आंदोलक ताब्यातआंदोलकांनी महापंचायतसाठी जंतरमंतरवरून निघू नये म्हणून पोलिसांनी त्यांच्याभोवती सुरक्षाकडे केले होते. कुस्तीपटूंनी हे कडे भेदण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांची पोलिसांशी चकमक उडाली.  पोलिसांनी ७०० आंदोलकांना ताब्यात घेतले आहेत. 

कुस्तीपटूंवर गुन्हारात्री उशिरा आंदोलकांना सोडून देण्यात आले. अटींचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आंदोलक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. 

तुम्ही सांगाल तिथे येण्याची तयारी...हे आयपीएस अधिकारी आम्हाला गोळ्या घालण्याबाबत बोलत आहेत. आम्ही गोळ्या झेलायला तयार आहोत,  तुम्ही सांगाल तिथे येतो. शपथ घेतो की, मी माझी पाठ दाखवणार नाही, मी माझ्या छातीवर तुमची गोळी खाईन. आमच्याबरोबर फक्त हीच गोष्ट उरली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोवर मागे हटणार नाही.- बजरंग पुनिया, कुस्तीपटू

टॅग्स :delhiदिल्ली