शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

''मी नोटाबंदीला मान्यता दिलीच नसती''

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 18:15 IST

'मी जर रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला मान्यता दिलीच नसती'

ठळक मुद्देमी जर रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला मान्यता दिलीच नसती, असं स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांनी व्यक्त केलंनोटाबंदीचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत पण त्यावेळी जर मी रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला मान्यता दिलीच नसती जोपर्यंत कोणतंही मोठं संकट कोसळत नाही, तोपर्यंत मी नोटाबंदीला मान्यता दिली नसती

मी जर रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला मान्यता दिलीच नसती, असं स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटबंदीच्या निर्णयाच्या घोषणेनंतर देशातील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, आता नोटाबंदीचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत पण त्यावेळी जर मी रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला मान्यता दिलीच नसती असं जालान म्हणाले. ‘भारत: भविष्य की प्राथमिकता’ या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं.यावेळी बोलताना, काळ्या पैशांच्या समस्येचा निपटारा करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं, पण त्यासाठी समस्येच्या मुळावरच घाव घातला पाहिजे. करांचे दर अधिक तर नाहीत ना, हे पाहायाला पाहिजे असं ते म्हणाले. भारत सरकार रुपयाची हमी देतं. पण जोपर्यंत कोणतंही मोठं संकट कोसळत नाही, तोपर्यंत मी नोटाबंदीला मान्यता दिली नसती असं ते म्हणाले.  ‘नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी असं कोणतंही संकट ओढवलं नव्हतं’, असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. नोटाबंदीचे नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन्ही परिणाम पाहायला मिळाल्याचं ते म्हणाले. नोटाबंदीमुळं चलन तुटवडा भासला आणि त्याचे वाईट परिणाम झाले, असं ते म्हणाले. यासोबतच बचत, गुंतवणूक आणि आयकर परताव्यात वाढ झाल्यानं या निर्णयाचा सकारात्मक परिणामही झाला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना त्यांनी जीएसटीबाबतही मत व्यक्त केलं. जीएसटी हे सरकारनं उचललेलं मोठं पाऊल असून जीएसटीचे दर दरवर्षी बदलण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. बिमल जालान हे 1997 ते 2004 पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी होते.