शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

पाकच्या वैमानिकांनी खरंच राफेल विमानं उडवली?, 'हे' आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 20:29 IST

राफेल लढाऊ विमानांवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

नवी दिल्लीः राफेल लढाऊ विमानांवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याच दरम्यान एक नवीच बाब समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान स्वतःच्या वैमानिकांना राफेल लढाऊ विमान उडवण्याचं प्रशिक्षण देत आहे. परंतु राफेल लढाऊ विमानं तयार करणारी फ्रान्समधील दसॉ एव्हिएशननं हा दावा फेटाळून लावला आहे.भारतात असलेल्या फ्रान्सच्या राजदूतांनीही हे वृत्त खोडून काढलं आहे. एका एक्सचेंज प्रोग्रामअंतर्गत पाकिस्तानी वैमानिकांना कतार एअरफोर्सकडून राफेल लढाऊ विमानं उडवण्याचं ट्रेनिंग फ्रान्समध्येच देण्यात आलं होतं. दुसरीकडे एव्हिएशन सेक्टरमध्येही या वृत्तानं खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी वैमानिकांना नोव्हेंबर 2017मध्ये ट्रेनिंग देण्यात आली. भारतात फ्रान्सचे असलेले राजदूत अलेक्झांडर झीगरल यांनी हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे.ट्विट करत ते म्हणाले, मी सांगू शकतो की ही फेक न्यूज आहे. काही दशकांपूर्वी पाकिस्तान स्वतःच्या वैमानिक आणि सैन्य अधिकाऱ्यांना मीडिल ईस्ट देशांतील सैन्याबरोबर युद्धसराव करण्यासाठी पाठवत होता. जॉर्डननंही एफ 16 लढाऊ विमानं पाकिस्तानकडे सोपवली होती. भारतावर करण्यात आलेल्या हल्ल्यात याच विमानांचा वापर करण्यात आल्याचीही चर्चा आहे. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डील