शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘एआय’च्या जगातील दिग्गज दिल्लीत, जगातील सर्वांत मोठ्या एआय परिषदेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:04 IST

भारत मंडपममध्ये गर्दीचा महापूर; रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि सुरक्षित एआय विषयाबाबत लोकांना प्रचंड उत्सुकता

नवी दिल्ली : भविष्यातील जगाची दिशा ठरवणाऱ्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठ्या शिखर परिषदेचा सोमवारी राजधानीतील ‘भारत मंडपम’ येथे दिमाखात शुभारंभ झाला. ‘एआय इम्पॅक्ट समिट’च्या पहिल्याच दिवशी जगभरातील तंत्रज्ञ, धोरणकर्ते आणि उद्योजकांनी मोठी गर्दी केल्याने राजधानीत जणू तंत्रज्ञानाचा महासागर लोटल्याचे चित्र पाहायला मिळाले. भारताने या व्यासपीठावरून ‘एआय’च्या लोकशाहीकरणाचा आणि ‘ग्लोबल एआय कॉमन्स’चा नारा दिला आहे.

अवघ्या जगाला जोडून जगाचा निरोप घेतला...; 'ग्रँडफादर ऑफ इंटरनेट' डेव्हिड जे. फार्बर यांचे निधन

सकाळी ९:३० वाजता परिषदेचे दरवाजे उघडण्यापूर्वीच प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ५०० हून अधिक सत्रांचे आयोजन करण्यात आलेल्या या परिषदेत अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन केले. सभागृहे क्षमतेपेक्षा जास्त भरल्यामुळे अनेक ठिकाणी ‘नो एंट्री’चे फलक लावावे लागले. रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि सुरक्षित एआय या विषयांवरील चर्चासत्रांना सर्वाधिक गर्दी दिसून आली. या परिषदेत ३,२५० हून अधिक वक्ते मार्गदर्शन करतील.

मुलांमध्ये लहानपणापासूनच वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित ड्रायव्हिंगची शिस्त लागावी, यासाठी शाळेच्या अभ्यासक्रमात एआयच्या मदतीने ड्रायव्हिंगचे मूलभूत शिक्षण दिले जाणार आहे. आयआयटी मद्रास यावर काम करत असून, भविष्यात ते अनिवार्य करण्याचाही विचार आहे, असे रस्ते वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी पंकज अग्रवाल यांनी  सांगितले.

१९ आणि २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या समारोपाच्या सत्रात पंतप्रधान मोदींसह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांसारखे २० हून अधिक जागतिक नेते सहभागी होणार आहेत.

पालकांसाठी अन् सरकारसाठी मोठे आव्हान

हे तंत्रज्ञान एका दुधारी तलवारीसारखे आहे. एआयमुळे मुलांचे शिक्षण सोपे झाले, मात्र धोके वाढले. मुलांना या तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा व ते सुरक्षित राहावेत, ही सरकारची जबाबदारी आहे, असे मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद म्हणाले.

दिग्गजांची मांदियाळी : गुगल, एनवीडिया, ॲमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय यांसारख्या दिग्गज कंपन्यांची प्रदर्शने.

३००  स्टॉल्स : एआयमधील नवनवीन संशोधने आणि स्वदेशी कंपन्यांच्या प्रयोगांचे सादरीकरण.

जागतिक पाहुणे : सुंदर पिचाई (अल्फाबेट), सॅम ऑल्टमन (ओपनएआय) आणि डारियो अमोदेई (अँथ्रॉपिक) यांचे सत्र बुधवारपासून सुरू होणार आहे.

थीम काय? : ‘लोक, ग्रह आणि प्रगती’ या त्रिसूत्रीवर आधारित ही  एआय परिषद आहे. यात भारत जगाला नवी दिशा देईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Global AI Summit Begins in Delhi, Showcasing Tech Advancements

Web Summary : Delhi hosts a major AI summit, drawing global tech leaders. Discussions focus on AI's democratization, skills, safety, and ethical considerations. The summit features exhibits, talks, and participation from global figures, including Prime Minister Modi.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स