शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

शासनाच्या अनुदानाशिवाय विश्व साहित्य संमेलन (१)

By admin | Updated: July 31, 2015 23:02 IST

- माधवी वैद्य : स्वा. सावरकरांच्या ५० व्या पुण्यतिथिनिमित्त अभिवादन

- माधवी वैद्य : स्वा. सावरकरांच्या ५० व्या पुण्यतिथिनिमित्त अभिवादन
नागपूर : स्वा. सावरकर अंदमानच्या कारागृहात होते. येथील सेल्युलर जेलमध्ये त्यांना बंदी म्हणून ठेवण्यात आले होते ती खोली आहे. सावरकरप्रेमींसाठी ही खोली प्रेरणादायी आहे. सावरकरांप्रमाणेच अनेक देशभक्त क्रांतिकारक या कारागृहात होते. यंदा स्वा. सावरकरांची ५० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने अंदमान येथे ५ आणि ६ सप्टेंबर रोजी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाला येण्यासाठी अनेक साहित्यप्रेमींनी इच्छा व्यक्त केली आहे. हे चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन प्रथमच शासनाच्या अनुदानाशिवाय आयोजित करण्यात येत असल्याची माहिती अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.
चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाची माहिती देताना त्या बोलत होत्या. या संमेलनाचे आयोजक पोर्टब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ आहे तर संयोजन ऑफबिट डेस्टीनेशनचे नितीन शास्त्री यांचे आहे. हे संमेलन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना समर्पित करण्यात आले आहे. संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वागत समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आहे. ९ ऑगस्ट रोजी महामंडळाच्या बैठकीत संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमांची निश्चिती करण्यात येणार आहे. मुळात हे संमेलन जोहान्सबर्ग येथे आयोजित होणार होते. पण या संमेलनासाठी शासनाचे अनुदान काही अपरिहार्यतेने रखडले. या अनुदानाशिवाय जोहान्सबर्गला संमेलन घेणे शक्य नव्हते त्यामुळे अंदमानचा विचार करण्यात आला आणि सावरकरांची ५० वी पुण्यतिथी हे औचित्यही ठरले, असे माधवी वैद्य म्हणाल्या. या संमेलनासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली असून संमेलनाला जाण्यास इच्छुक रसिकांनी नितीन शास्त्री यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
-----------
अद्याप साहित्य संमेलनाचा निर्णय नाही.
साहित्य संमेलनासाठी तब्बल १२ आमंत्रणे आहेत. त्यात बारामतीची चर्चा लोक करीत आहेत, हे माझ्याही कानावर आले पण महामंडळाने काहीही ठरविलेले नाही. डोंबिवली, पिंपरी चिंचवडचे दोन, सातारा, नांदेड, गोंदिया, बारामती, नृसिंहवाडी, उस्मानाबाद, गुलबर्गा आदी ठिकाणांची निमंत्रणे आहेत. अ. भा. संमेलन कुठे घेणार याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. कार्यकारिणीच्या बैठकीतच यावर निर्णय होई. तूर्तास विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाकडेच महामंडळाचे लक्ष आहे, असे त्या म्हणाल्या.